Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुरुषांना सर्वाधिक त्रास देणारे हे 5 आजार, तज्ज्ञांनी सांगितले समाधान

Updated: गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (10:16 IST)
 
* रक्तदाबाची समस्या -
बीपी ची समस्या सामान्य होत आहे. 10 ते 15 वर्षांपूर्वी ही समस्या केवळ 40 वर्ष ओलांडलेल्या लोकांमध्येच आढळायची. पण आता किशोरवयीन मुले देखील या आजाराला सामोरी जात आहेत. एखाद्याला लो बीपीची समस्या असते तर एखाद्याला हाय बीपीची समस्या असते. 
 
तज्ज्ञांच्या मते रक्तदाबाशी निगडित समस्या अशी काही नाही की त्याला नियंत्रित केले जाऊ शकतं नाही. कमी वयातच योग्य आहाराने, शारीरिक हालचाली आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतं असल्यास या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. तथापि करिअरच्या शर्यतीत आणि सामाजिक दबाव आल्याने पुरुषांमध्ये रक्तदाबाची समस्या कमी वयात बघायला मिळते. 
 
* प्रोस्टेटचे आजार - 
तज्ज्ञांच्या मते, पुरुषांमध्ये होणाऱ्या कर्करोगात प्रोस्टेटचा कर्करोग सर्वात जास्त आढळून येत आहे. तथापि हा कर्करोग हळू -हळू वाढतो आणि 
 
वेळेत याचे निदान झाल्यास, याचे पूर्णपणे निर्मूलन देखील केले जाऊ शकते. या साठी आवश्यक आहे की पुरुषांनी वयाच्या 45 वर्षानंतर वेळोवेळी प्रोस्टेट ग्रंथीची 
 
वैद्यकीय तपासणी करावी. चिकित्सकांना भेटून आपले संपूर्ण आरोग्याची तपासणी दर 6 महिन्यांनी करवावी. जर प्रोस्टेटच्या कर्करोगाचे सुरुवातीच्या काळातच असल्याचे निदान झाले असल्यास या कर्करोगाला मुळातून नष्ट करता येऊ शकतं.
 
* मधुमेह - 
झपाट्यानं मधुमेह वाढत आहे. तज्ज्ञ सांगतात की आपल्या समाजात मधुमेहाच्या रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुरुषांमध्ये या आजाराचे प्रमाण झपाट्यानं वाढले आहे. कारण सर्वाधिक प्रकरणे टाईप -2 मधुमेहाची दिसून येत आहे तर या मुळे हे स्पष्ट आहेत की आपल्या जीवनशैलीत आलेल्या नकारात्मक बदलामुळे पुरुष झपाट्यानं मधुमेहाचे रुग्ण बनत चालले आहे. 
 
* या आजारापासून वाचण्यासाठी काय करावं - 
पुरुषांच्या समस्येबद्दल बोलताना तज्ज्ञ या समस्येपासून दूर राहण्याचे मार्ग देखील सुचवत आहे. त्यांच्या मतानुसार मधुमेहाच्या वेळ्ख्यातुन लांब राहण्यासाठी सर्वात आधी महत्त्वाचे आहे की आपण आपल्या जीवनशैलीशी साजेशी आहार घ्यावा.आपल्या कामाचे स्वरूप बसण्याचे असल्यास, आपण स्टार्च आणि नैसर्गिक गोडवा असलेल्या पदार्थांना आपल्या आहारा पासून लांब ठेवावं. जसे की तांदूळ, बटाटे, गव्हाच्या पिठाच्या पोळ्या याचे सेवन मर्यादित करावे. तज्ज्ञ सांगतात की जर आपल्याला मधुमेहाने वेढले आहे आणि आपल्या कौटुंबिक इतिहासात मधुमेह असल्यास एकावेळी 2 पेक्षा जास्त 
 
गव्हाच्या पोळ्या खाऊ नये- 
कारण गव्हामध्ये नैसर्गिक साखर असते. तसेच कार्बोहायड्रेट देखील मुबलक प्रमाणात असते. या कारणास्तव हे शरीरात जाऊन झपाट्यानं रक्तातील साखर वाढविण्याचे कार्य करतं. या परिस्थितीशी वाचण्यासाठी आपण अन्नाला एकाच बैठकीत अधिक प्रमाणात खाण्याऐवजी कमी कमी वेळा घ्यावे. 
 
* एवढं चालणं देखील पुरेशे आहेत - 
तज्ज्ञ सांगतात की काही लोकांना जिमखान्यात जाऊन व्यायाम करणे आवडत नाही. तर कोणाला योगा करणं कमी आवडत. अशा परिस्थितीत चालणे म्हणजे वॉक करणे अशी क्रिया आहे जी बऱ्याच लोकांना आवडते आणि खूप प्रभावी असते. 
 
जर आपण घरातून निघून 2 किमी चालत आला आणि तेवढेच चालत परत घरी गेला तर आपल्याला कोणतेही व्यायाम करण्याची आवश्यकता वाटणार नाही. कारण वॉक हे आपल्या शरीरातील सुमारे 80 टक्के स्नायूंचा व्यायाम करतात. जे लोक लवकर थकतात, त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात अशा प्रकारे करावी.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, आरोग्यवर्धक जीवन जगण्यासाठी पुरुषांनी वेळोवेळी आपल्या आरोग्याची तपासणी करावी. पुरुषांनी 45 वर्षाच्या नंतर संपूर्ण आरोग्याची तपासणी सुरू करायला हवी आणि वयाच्या 50शी नंतर मूत्राशयाचे आरोग्य राखून अल्ट्रासाउंड करायला हवे.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

World PT Day 2026 आज जागतिक फिजिओथेरपी दिन

Happy Matrudin Pithori Amavasya Images मातृदिन पिठोरी अमावस्या शुभेच्छा फोटो

फेरोमोन मॅक्सिंग म्हणजे काय? डेटवर जाण्यापूर्वी काही लोक आंघोळ आणि डिओडोरंट्सचा वापर का टाळत आहेत?

Homemade Khajur Peda गोड खायची तीव्र इच्छा झाली आहे! मग पटकन बनवा खजूर पेडा

चहा सोडल्यावर शरीरात होणारे ९ मोठे बदल जाणून तुम्हाला धक्का बसेल

पुढील लेख
Show comments