Daily Horoscope
✕

International No Diet Day: का साजरा केला जातो? इतिहास काय आहे ते जाणून घ्या

Updated: शनिवार, 6 मे 2023 (10:44 IST)
 
डाएटिंग केल्याने आपण अनेक आवश्यक पोषक घटक वगळतो आणि आपल्या शरीरात थकवा येण्याची समस्या वाढू लागते. केवळ शारीरिकच नाही तर डाएटिंगमुळे आपल्या मानसिक आरोग्यावरही खूप परिणाम होतो. हे धोके लक्षात घेऊन दरवर्षी 6 मे रोजी आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस   (International No Diet Day)साजरा केला जातो आणि सोशल मीडियावर अनेक मोहिमाही चालवल्या जातात.
 
चला तर मग जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवसाची संपूर्ण माहिती
आंतरराष्ट्रीय नो-डाएट दिवसाची सुरुवात कशी झाली?
मेरी इव्हान्स यंग यांनी 1992 मध्ये या दिवसाची सुरुवात केली होती. मेरी एक ब्रिटीश स्त्रीवादी आणि 'डाएट ब्रेकर' नावाच्या समूहाची संचालक देखील आहे. मेरीला या दिवसाची कल्पना तिच्या शालेय दिवसांपासून आली जेव्हा तिच्या लठ्ठपणामुळे शाळेत तिची छेड काढली जात असे.
 
मेरीने 1992 मध्ये लंडनच्या हाइड पार्कमध्ये पिकनिक म्हणून काही महिलांसोबत 'डिच दॅट डाएट' 'ditch that diet'या घोषणेसह दिवसाची सुरुवात केली.
 
इंटरनॅशनल नो डाएट डे का साजरा केला जातो?
 
आहार संस्कृतीच्या विरोधात आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश हा आहे की लोकांनी त्यांचे शरीर स्वीकारण्यास शिकले पाहिजे आणि सर्व शरीर प्रकारांचा आदर करावा.
 
तसेच या दिवसाच्या माध्यमातून लोकांमध्ये शरीराच्या दर्जामुळे स्वत:च्या शरीराला दुखापत होऊ नये यासाठी जनजागृती करण्यात यावी. या दिवसाचे प्रतीक म्हणजे हलका निळा रिबन  (Blue ribbon).
 
अस्वीकरण (Disclaimer): औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेबदुनियात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. यासंबंधीचा कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Bhai Dooj 2026 भावाला खूश करण्यासाठी बनवा खास थाळी, जाणून घ्या सोप्या पाककृती

Happy Diwali Padwa to Husband in Marathi Images नवर्‍याला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

दिवाळीत दिसायचे आहे सर्वांत सुंदर? ग्लोइंग लुकसाठी मेकअपच्या ‘या’ खास टिप्स फॉलो करा

Annakut गोवर्धन पूजेसाठी घरी 'अन्नकूट' कसे तयार करावे? परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments