Biodata Maker marathi
✕

पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्या हे नैसर्गिक पेय, लवकरच दिसेल फरक

Updated: सोमवार, 9 मे 2022 (15:51 IST)
 
 पोटाची चरबी कमी करण्यासाठी नैसर्गिक पेये
 
1) खजूर आणि केळीचे पेय- पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही केळी आणि खजूरपासून बनवलेले पेय पिऊ शकता. यासाठी एक केळी, एक कप बदामाचे दूध, एक खजूर आणि चिमूटभर दालचिनी एकत्र मिक्स करा. तुमची चयापचय गती वाढवण्यासाठी ही खजूर आणि केळीचे पेय प्या.
2) ग्रीन टी-  वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी ग्रीन टी खूप फायदेशीर आहे . हे चयापचय वाढवते, त्यामुळे ते चरबी जाळण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. हे करण्यासाठी, पाणी गरम करा आणि नंतर एक कप गरम पाण्यात टी बॅग ठेवा. काही वेळ असेच राहू द्या आणि मग हा चहा प्या. 
3) दालचिनी आणि मध- दालचिनी आणि मध देखील पोटावरील चरबीसाठी उपयुक्त ठरतात. यासाठी एका ग्लास पाण्यात दालचिनी पावडर आणि मध घालून चांगले मिसळा. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. तुम्ही पेयासाठी वापरत असलेले पाणी गरम नसून खोलीच्या तपमानावर असावे याची खात्री करा.
4) काकडी, लिंबू आणि आले पाणी- हे करण्यासाठी चिरलेली काकडी, १ लिंबाचा तुकडा, १ चमचा किसलेले आले, पाणी आणि पुदिन्याची पाने पाण्यात टाकून रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी गाळून दिवसभर प्यावे. हे चार आठवडे प्या आणि तुम्हाला फरक दिसेल.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

कार्तिकी एकादशीच्या फराळासाठी खास नवीन आणि हटके रेसिपीज येथे पहा Upvas Recipes for Kartiki Ekadashi

Benefits of guava हिवाळ्यात पेरू खाणे रोगप्रतिकारशक्तीपासून ते पचनापर्यंत अत्यंत फायदेशीर

हिवाळ्यात तुमचे ओठ फुटतात का? त्यांना नैसर्गिकरित्या मुलायम ठेवण्यासाठी घरीच बनवा ''पारिजातक फुलांचा लिप बाम''

पौराणिक कथा : विंध्याचल पर्वताच्या गर्वाचा नाश

Saffron Milk हिवाळ्यात दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट ''केसर दूध'' पिण्याचे प्रमुख फायदे

पुढील लेख
Show comments