Marathi Biodata Maker
✕

होतं असं कधी कधी......

Updated: गुरूवार, 30 मार्च 2017 (14:37 IST)
 
माया,कणव दाटून येते मनात आपल्या...
 
'कसं आपल्या आई वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत??' 
 
पाकिटात हात जातो...
 
शंभराची नोट लागते हाती...
 
व्यवहार जागा घेतो ममतेची...
 
समोरचा म्हातारा ओळखतो... बदलतो...
 
"दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा..."
 
तो सुटका करतो आपली पेचातून...
 
आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून...
 
*
 
दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले...
 
आज कामवाली येणार की नाही याची धाकधूक असते...
 
तिच्या असण्याने आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा  वेळी...
 
दुपारची जेवणे उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात...
 
ती येते...
 
काम आटोपते...
 
तिच्या मुलांना राहिलेली बासुंदी द्यावी का ह्या संभ्रमात असताना ती एक डब्बा देते हातात आपल्या...
 
चिवडा लाडू असतो त्यात...
 
"तुम्ही दर वेळा देता... आज माझ्याकडून तुम्हाला..."
 
'कोण श्रीमंत कोण गरीब', हा विचार सोडत नाही पिच्छा आपला...
 
*
 
ढाराढूर झोपेत असतो उन्हाळ्याचे गच्चीवर...
 
आई उठवते उन्हं अंगावर  आल्यावर...
 
अंगात ताप असतो तिच्या...
 
आपण सुट्टीचा आलोय घरी म्हणून उसनं बळ आणते अंगात ती...
 
मेसच्या खाण्याने आबाळ होत असेल म्हणून चार दिवस होईल तेवढे जिन्नस पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात आपल्यासोबत...
 
दिवस उलटतात...
 
वडिलांचा एके रात्री फोन येतो...
 
"काम झालं असेल तर आईला एक फोन कर... आज तिचा वाढदिवस होता..."
 
कोडगेपणा म्हणजे हाच तो काय...!
 
चडफडत facebook च्या virtual मित्राना केलेले  birthday विश आठवतात.....
 
लाजत तिला फोन करतो...
 
"आमचा कसला रे या वयात वाढदिवस? तू जेवलास ना?? तब्येतीला जप बाबा..."
 
ती बोलते...
 
कानात गरम तेल ओतल्याचा भास होतो...
 
 
अश्रूंचा मुक्त वावर होतो डोळ्यांतून...
 
काहीतरी दुरावलंय आपल्यापासून इतकंच जाणवत राहतं...
 
 
खरंच, 
होतं असं कधी कधी....!!!
 
***

सर्व पहा

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

अथर्व सुदामेच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमावरून वाद; अभिनेता कुशल बद्रिकेचा जाहीर संताप

सर्व पहा

‘ढसाळ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित! अभिनेता ललित प्रभाकर यांनी पद्मश्री नामदेव ढसाळ यांची भूमिका साकारली

अमिताभ बच्चन यांना काय झाले आहे? ब्लॉग न लिहिण्याचे सांगितलेले कारण आणि हेल्थ अपडेट

“मेरी आँखों में झाँको!”; कोण होणार करोडपतीच्या मंचावर माधुरीने हुबेहूब केली नम्रताची नक्कल!

मुंबईच्या अंडरवर्ल्डची कथा मोठ्या पडद्यावर दाखवली जाणार, हर्षवर्धन राणे ही भूमिका साकारणार

दिवाळीच्या सुट्टीत महाराष्ट्रातील ही ७ ठिकाणे कुटुंबासोबत फिरण्यासाठी ठरू शकतात उत्तम

पुढील लेख
Show comments