Daily Horoscope
✕

मराठी विनोद : लग्न गुलाबजाम आणि जिलेबीचे

Updated: गुरूवार, 22 जून 2017 (12:57 IST)
 
इमरतीने आपल्या बहिणीला रबड़ीला मदतीला बोलावून घेतले,तिच्या बरोबर लस्सीही आली...
 
इकडे श्रीखंडाने आपल्या मोठ्या भावाला आम्रखंडाला बोलावणे धाडले..बासुंदीची बहिण खीर आणि त्यांची सगळी मूल, रवा, गवले, तांदूळ इत्यादि यांना बोलावले गेले...
 
बोलता बोलता...लग्नाची तारीख येवून ठेपली..
 
मांड्याच्या पुरणपोळीचा मांडव घालण्यात आला...
 
मुंबई हलव्याचे स्टेज तयार करण्यात आले..त्यावर छान सूंदर सोनपापडीचे जाजम अंथरण्यात आले...
 
स्टेजच्या मागे...वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेटची फुले  आणि तऱ्हेतऱ्हेच्या गोळयांच्या माळांनी आरास करण्यात आली..
 
पिठीसाखरेची रांगोळी घालण्यात आली...
 
स्टेजवर चढण्यासाठी काजुकतलीच्या पायऱ्या करण्यात आल्या...
 
हळूहळू पाहुण्यांनी मंडप भरू लागला...विविध प्रकारच्या बिस्किटाच्या, नानकटाइच्या खुर्च्या मांडण्यात आल्या..
 
एक एक पाहुणे येवू लागले.... बालुशाही आपल्या राजेशाही थाटात मंडपात विराजमान झाली.... ...वेगवेगळ्या बर्फीची लगबग सुरु झाली... 
 
कलाकंद, घेवर, मालपुवा, गुळ पापड़ी इत्यादि मंडळी येवून विराजमान झाली...
 
बूंदी, शंकरपाळी, चिक्की ई. लहान लहान मुले उगाच इकडे तिकडे पळत दंगा करत होती....नुक्ती आपला जूना रुबाब कायम ठेवत दुरून सर्व बघत होती....
 
दूर कोपऱ्यात गावाकडून आलेले गोडीशेव आणि रेवड़ी आपले अंग चोरून एवढा तामझाम बघुन उगाच बिचकुन बसले होते..
 
सगळ्यांची नजर चुकवत शंकरपाळा, रसभरीत कुल्फिवर लाइन मारत मंडपात तिच्या मागे मागे फिरत होता...
 
म्हैसूरपाक,गाजर हलवा आणि मुगडाल हलवा आल्या गेल्याचे स्वागत करत होते..
 
आमरस बाहेर गावी गेला असल्याकारणाने त्याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती.
 
तेवढ्यात कोणीतरी सांगितले की वरमाय रुसून बसली...शेवटी म्हाळसा सारखीच ती, तिची समजूत काढत तिला स्टेजवर आणण्यासाठी सुतारफेणीच्या पायघड्या घालण्यात आल्या...
 
मग याद्यात् ठरल्याप्रमाणे थोऱ्या मोठयांचा म्हणजे करंजी, साठोरी, अनारसे,नारळीभात, इत्यादि यांचा मानपान करण्यात आला.
 
शिरा आणि त्याची बायको लापशी यांना 'मेहुन' म्हणून बोलावण्यात आले..
 
तेवढ्यात गुरूजी म्हणजे 'उकडीचे मोदक' यांनी विवाह समय जवळ आल्याची व वराला वधुला मंडपात आणण्याची आज्ञा दिली...
 
गुलाबजामचे मामा पेढ़े आणि जिलेबीचे मामा पेठा  वधुवरांना घेवून मंडपात आले.
 
साखर फुटाण्यांच्या अक्षता वाटण्यात आल्या...
 
ग़ुलाबजामच्या पायावर पाकाचा अभिषेक करून पाद्य पूजन करण्यात आला...जिलेबी वधु आपल्या नारंगी शालुत खुपच खुलुन दिसत होती...तिला केशराचा टिळा लावण्यात आला...
 
माहिम हलव्याचा अंतरपाठ धरण्यात आला..मंगलाष्टके झाली....
 
छोट्या छोट्या गोळ्याच्या माळांचा हार वधु वरांनी एकमेकांना घातला...
 
लग्न लागताच पंच तिखट आणि चमचमित जेवणाच्या पंक्ती उठु लागल्या..
 
जेवणात...समोसे, कचोरी, भेळ, पाणीपुरी, SPDP ढोकळा, ठेपले, बटाटेवडा, मिरची वडा अश्या आणि अनेक पक्वान्नाचा फडशा पडत होता..
 
जेवणावळी नंतर, जिलेबीची पाठवणीची वेळ आली.
 
चॉकलेटची गाडी सजवली गेली...जिलेबी जाताना आईच्या गळ्यात पडून रड़ू लागली...ते पाहताच तिच्या वडिलांच्या म्हणजे बूंदीच्या लाडुच्या डोळ्यात सुधारस दाटुन आला तो अलगद पुसत त्याने जिलेबीला आशीर्वाद दिला...
 
चॉकलेटची गाडी जिलेबी आणि गुलाबजामला घेवून रवाना झाली.
 
 " स्वप्नरंजीत गोडघाश्या"⁠⁠⁠⁠

सर्व पहा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

हास्यजत्रा फेम कलाकाराचे अकस्मात निधन

बाबरीच्या जागेवर राम मंदिर उभारणीमुळे मुस्लिम मित्रांची माफी; स्वरा भास्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात!

दाऊदसोबतच्या 'त्या' फोटोवर मंदाकिनीचा मोठा खुलासा; "त्याने मला दुबईला बोलावले नव्हते"

३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनंत नाग यांना दादासाहेब फाल्के पुरस्कार प्रदान केला जाणार

राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचा अभिनेत्याला कडक आदेश, इतके कोटी रुपये जमा करण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments