Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हसू थोडं, व समजू थोडं

Updated: बुधवार, 14 नोव्हेंबर 2018 (12:39 IST)
वस्तू कुठे ठेवली हे
बायको विसरते
दिवसभर नवऱ्यावर
उगीचच डाफरते
 
लग्नात पाचवारी बायकोला
खूप होत होती मोठी
आता नऊवारी गोल नेसताना
बायकोला होतेय खूपच छोटी
 
बायकोच्या प्रेमाची गड्यांनो
तर्‍हाच खूप  न्यारी असते
पाहिजे तेव्हा रेशन लागते
नको तेव्हा उतू जाते
 
वयाच्या साठीनंतर
एक मात्र बरं असतं
बायको ओरडली तरी
नवऱ्याला ऐकू येत नसतं
 
काट्याकुट्याच्या रस्त्यातून
नवरा किती मस्तीत चालतो
याला कारण खरं बायकोचा
मस्त, धुंद सहवास असतो
 
बायको गावाला गेली की
देवाशपथ, करमत नसतं
क्षणाक्षणाला रुसणारं
घरात कुणीच नसतं
 
नवरा-बायकोचं
वेगळंच नातं असतं
एकमेकांचं चुकलं तरी
एकमेकांच्याच मिठीत जातं
 
बायकोवर रागावलो तरी
तिचं नेहमी काम पडतं
थोडावेळ जवळ नसली तर
आपलं सर्वच काही अडत असतं
 
अव्यव्यस्थित संसाराला
व्यवस्थित वळण लागते
त्यासाठी मधूनमधून
बायकोचे ऐकावंच लागते
 
सूना-नातवंडासह आता
घर चांगले सजले आहे
बायको एकटी सापडत नाही
दुःख मात्र एवढंच आहे.

बायकोशी भांडताना 
मन कलुषित नसावं
दोघांचं भांडण
 खेळातलच असावं
 
नाती असतात पुष्कळ
पण नसतो कुणी कुणाचा
खरं फक्त एकच नातं असतं
नवरा  बायकोच
 
सर्व दांपत्याना समर्पित 

सर्व पहा

करण जोहर 'ट्रेटर्स २' शोच्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार

कियारा अडवाणीचे खरे नाव माहित आहे का? सलमान खानच्या या सल्ल्याने तिची ओळख बदलली

मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात रेखा यांना विशेष सन्मान मिळणार; 'उमराव जान' प्रदर्शित होणार

करिश्मा तन्ना आणि पती वरुण बंगेरा आई-बाबा झाले, गुरुपौर्णिमेला छोटा राजकुमार घरी आला

'रामायणम'मधील रकुल प्रीत सिंगचा 'शूर्पणखा' लूक चर्चेत; चाहत्यांनी 'परफेक्ट कास्टिंग' म्हटले

सर्व पहा

कंगना रणौत हृतिक रोशनवर संतापली, पार्टनरला लाजिरवाणे करणे थांबवा म्हणाली

अभिनेते व्हिन्सेंट पास्टोर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन

विकी जैनने 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात केली, टायगर श्रॉफ त्याच्या पहिल्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार

अरावली पर्वतरांगांच्या कडेला वसलेले रणकपूर जैन मंदिर राजस्थान; अप्रतिम संगमरवरी कोरीवकामासाठी जगभरात प्रसिद्ध

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

पुढील लेख