Daily Horoscope
✕

घर दोघांचं असतं दोघांनी सावरायचं असतं

Updated: बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 (12:36 IST)
 
बायको खूप हौशी असेल तर नवरा जरा पडेल असतो, 
नवरा सोशल असेल तर बायको अतिशय मर्यादित असते,
 
बायको बडबडी तर नवरा अबोल, 
नवरा भटकंती स्पेशल तर बायको घरकोंबडी ,
 
बायकोला रात्री लॉंग ड्राईव आवडतो तर नवरा टीवी पाहणं पसंत करतो, 
त्याला खूप मित्र तर हिला लोकांची अँलर्जी, 
 
ती उत्सव प्रिय तर त्याला अजिबात आवड नाही, 
फिरायला जायचं तर त्याला निवांत समुद्र किनारा आणि तिला जंगल किंवा भरपूर स्थलदर्शन आवडतं, 
 
त्याला एकदम मॉडर्न राहायला आवडतं तर ती एकदम साधी, 
ती अतिशय सडेतोड तर तो एकदम भिडस्त ,
 
हॉटेलमधे तिला कॉंटिनेंटल तर त्याला थाळी आवडते, 
ती फ्रिकाऊट तर तो एकदम शांत.... 
 
असंच असतं सहसा, नाही का ?
 
पण मग तरीही अशाच जोड्या अतिशय छान संसार करतात - का बरं ? 
 
म्हणतात ना, opposite poles attract - 
 
विजोड जोड्या नाही म्हणायचं .. उलट भिन्न स्वभावधर्माच्या जोड्या असतील तर संसारात मजा आणि थोडा खमंगपणा असतो.. 
 
दोघंही जर शांत असतील तर मग घरात बोलणार कोण ? दोघंही मित्र मंडळीत रमणारे असतील तर घर बघणार  कोण ? 
दोघंही भटके असतील तर घराला घरपण आणणार कोण ? आणि दोघंही परफेक्शनिस्ट असतील तर चुका काढणार कोण ? 
 
आणि दोघंही समान पातळीवर असतील तर समतोल साधायला काहीच उरणार नाही..
 
थोडं पुढे - मागे, अधिक - उणं झाल्याशिवाय मजाच नाही ना ! सारं कसं शांत - शांत ! 
 
मग ते घर नाही, संन्याशाची मठी वाटेल.. 
 
एकमेकांना समजून घेण्यात, एकमेकांच्या आवडी-निवडी जपण्यात, आणि एकमेकांना आहे तसं स्वीकारतानाच आपले मीपण जपण्यात खरी मजा आहे - जगण्याची - 
 
नाही का ? 
म्हणून तर म्हणायचं - 
 
*घर दोघांचं असतं दोघांनी सावरायचं असतं, 
एकानी पसरलं तरी दुसऱ्यानी आवरायचं असतं*
 
व.पु.

सर्व पहा

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

'जेलर २' मधील विद्या बालनचा धोकादायक लूक समोर आला; अभिनेत्री 'कांता'च्या भूमिकेत रजनीकांतसोबत टक्कर देणार

'हनुमान अंश'च्या प्रचंड कमाईनंतर, डॉ. विशाल चतुर्वेदी यांची मोठी घोषणा: ते 'राम बोला'मधून मिळणारी १००% कमाई दान करणार

अनुभव सिन्हा यांच्या चित्रपटात वहिदा रहमान साकारणार महात्मा गांधींच्या आई पुतलीबाईची भूमिका

सर्व पहा

शाहरुख खानपासून ते आलिया भट्टपर्यंत, अनेक सेलिब्रिटींनी राणी मुखर्जी यांच्या आईच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

राणी मुखर्जी यांच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

शाहरुख खानने पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

पुढील लेख
Show comments