Marathi Biodata Maker

भेट .... कधीतरी . . . आपलीच आपल्याशी

Updated: गुरूवार, 29 सप्टेंबर 2016 (15:09 IST)
भेट थोरा-मोठ्यांची असते
इतिहासाच्या पानात मिरवते....
भेट दोन बाल-मित्रांची असते
फारा वर्षांनी भेटल्यावर
पिकल्या केसांचा अंदाज घेत
चाचपलेली.....

भेट कधी अवघडलेली
'झक' मारल्या सारखी ....
भेट कधी मनमोकळी
मनसोक्त मैफील रंगवलेली

भेट कधी गुलदस्त्यातली
कट-कारस्थान रचण्यासाठी
भेट कधी जाहीरपणे
खुलं आव्हान देण्यासाठी

भेट कधी पहिली- वहिली
पुढल्याची ओढ वाढवणारी
भेट कधी अखेरची ठरते . .
मनाला चुटपुट लावुन जाते

भेट कधी अपुरी भासते
बरंच काही राहून गेल्यासारखी
भेट कधी कंटाळवाणी
घड्याळाकडे पाहुन
ढकलल्या सारखी . .

भेट कधी चुकुन घडते
पण आयुष्यभर पुरून उरते
भेट कधी 'संधी' असते
निसटुन पुढे निघुन जाते

भेट कोवळ्या प्रेमीकांची
लाजरी-बुजरी नुसतीच नजरानजर
भेट घटस्फोटीतांची ही असते
हक्क सांगण्यासाठी मुलांवर

भेट एखादी आठवणीतली असते
मस्त nostalgic करते
भेट नकोशी भूतकाळातली
. . सर्रकन अंगावर काटा आणते

भेट .....
विधिलिखीत ... काळाशी-
न टाळता येण्याजोगी !

भेट ....
कधीतरी . . .
आपलीच आपल्याशी
अंतरातल्या.....स्वत:शी !
आयुष्याच्या नाजुक वळणापाशी....

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

"मास्क घालून विद्यार्थ्यांवर अत्याचार?" NEET आंदोलनावरील लाठीमारावर संतापले नसिरुद्दीन शाह; म्हणाले– लढा सुरूच ठेवा!

18 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू

बिग बॉस २० ची घोषणा, सलमान खान पुन्हा एकदा सूत्रसंचालन करणार

हिमाचल प्रदेशच्या खोऱ्यांमध्ये वसलेले जिभी, पर्यटकांची पहिली पसंती बनले

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी: बॉलिवूडच्या कलाकारांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला

पुढील लेख
Show comments