1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
  6. दैनिक राशीफल (07.03.2013)

Free Astrology | दैनिक राशीफल (07.03.2013)

WD
मेष : आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास क्रोध येण्याची शक्यता आहे. योग्य उद्योगात गुंतवणूक करणे शेवटी आर्थिक मिळकत आणि नफा आणते.

वृषभ : काही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.

मिथुन : आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.

कर्क : शांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा नाहीतर इतरांवर चूक प्रभाव पडणे शक्य आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.

सिंह : योजनांमध्ये परिवर्तन करणे आपणास इतर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. कार्ययोजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.

कन्या : घरातील वातावरण आनंददायी राहील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.

तूळ : आर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.

वृश्चिक : पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.

धनू : जर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.

मकर : आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात पाहिजे असलेल्या वस्तुंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा.

कुंभ : सुख-शांतीचे वातावरण राहील. मनोविनोदनामध्ये वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल. व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.

मीन : आज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शक्य आहे. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. विशिष्ट व्यक्तींचा संपर्क सुखद वाटेल. वरिष्ठांकडून सहयोग मिळेल. स्त्री पक्षाची स्थिती संतोषजनक राहील.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा