दैनिक राशीफल (13.04.2013)
मेष : बुद्धिच्या प्रयोगाने कामात वृद्धि होईल. शत्रुंपासून हानि होण्याची शक्यता. कायदेशीर बाबी सुधारतील. लाभ होण्याचे योग. वृषभ : नवीन कार्ययोजनेचे प्रबळ योग. प्रेम संबंधात यश प्राप्ति. घरात शांतता राहील. मान-सन्मान व यश प्राप्त होईल.मिथुन : प्रिय व्यक्तिची भेट घडेल. कामात उन्नति होईल. स्फूर्ति राहील. धार्मिक गोष्टीत रस घ्याल. व्यक्तिगत अडचण राहू शकते.कर्क : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.सिंह : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील. सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.कन्या : दुसर्यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.तूळ : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा.वृश्चिक : विशेष उन्नतिकारक योगांमुळे मनात प्रसन्नता राहील. जीवनात विविधतापूर्ण वातावरण निर्मित होईल. रागावर नियंत्रण ठेवा.धनू : महत्वाकांक्षेनुसार कामे होतील. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. विरोधकांपासून त्रास होण्याची शक्यता. कलात्मक कार्य होतील.मकर : सामाजिक कामात सन्मान प्राप्त होईल. नोकरीत स्थिति चांगली राहील. उदार मनाने व क्षमावान व्यवहाराने लाभ होईल. व्यापार चांगला चालेल.कुंभ : मनात उत्साहपूर्ण विचारांमुळे वेळ चांगला जाईल. जबाबदारीची कामे पूर्ण यशा बरोबर पूर्ण होतील.पद-प्रतिष्ठे संबंधी कामांमध्ये लोकप्रियता वाढेल. धार्मिक क्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग. मीन : आध्यात्मिक तेजामुळे नवीन चेतना मिळेल. निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते.