मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
Written By वेबदुनिया|

दैनिक राशीफल (20.09.2013)

WD

मेष : पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी
चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती चांगली राहील.

WD


वृषभ : इतर लोकांना आपला विचार विकण्याची आपली योग्यता अप्रतिम आहे. मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ
व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल.

WD


मिथुन : गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू शकाल. आपल्या जोडीदाराबरोबर उत्तम वेळ
व्यतीत कराल पण घरगुती मुद्दे आपले लक्ष विचलीत करतील.
WD


कर्क : आनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात
अडकलेले कामे पूर्ण होतील.


WD


सिंह : आवडीचे काम झाल्याने परिस्थिती आनंददायी राहील. व्यापार-व्यवसायात वेळ अनुकूल आहे. चाकरमान्यांना लाभ
मिळेल.


WD


कन्या : आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला
नवीन दिशा मिळेल. प्रवास व बौद्धिक कामे संभवतात.


WD


तूळ : सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या विचारांपासून प्रभावित व्हावे यासाठी
त्यांच्या समोरील आपले सादरीकरण प्रभावशाली करा.

WD


वृश्चिक : आजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे करतील.


WD


धनू : आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचा दिवस. काही विशेष करण्याचा प्रयत्न करा. आज रात्री आपणास प्रेमात
अत्यंत सुख मिळेल.



WD

मकर : आज आपणास नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आपण त्यांचा योग्य वापर केल्याने आपणास चांगले यश
मिळू शकते.


WD


कुंभ : इतर लोकांना आपल्या स्वतःच्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांबरोबर
किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फलदायी आहे.


WD


मीन : चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल.