1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013

साप्ताहिक राशीफल 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2013

मेष

WD

नव्या योजनांची अंमलबजावणी यशस्वी होईल. व्यवसायात चाललेल्या प्रयत्नांना यश येईल. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने तोंड द्याल. व्यवसाय उद्योगात आपणास विरोध करणार्‍या व्यक्तींकडून लाभ होतील. मेहनतीचे चीज झाल्याने समाधान लाभेल. भविष्यकाळाच्यादृष्टीने आर्थिक तजवीज करणे शक्य होईल. मोठी आर्थिक उलाढाल केली जाईल. भागीदारी व्यवसातून नवीन उपक्रम राबविणे शक्य होईल. शुभदिनांक ५, ६.

वृषभ

WD

थोरा-मोठय़ांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्जप्रकरणे मंजूर होतील. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. अचानक धनप्राप्ती होईल. वारसाहक्काने धनप्राप्ती होण्याचे योग आहे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. पण त्याकडे दुर्लक्ष करा. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. शुभदिनांक ३, ४.

मिथुन

WD

कर्तव्य भावना ठेवून वागावे. पत्नीचा सल्ला उपयोगी पडेल. जोडीदारांच्या मताचा आपल्यावर पगडा राहील. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. वरिष्ठांशी मर्जी संपादन कराल.वेगवान प्रगती होण्यासाठी आपली जिद्द, महत्वाकांक्षा वाढवावी लागेल. मिळालेल्या संधीचा लाभ आपल्या भविष्य उज्‍जवल करणारा राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. शुभदिनांक ७.

कर्क

WD

संततीच्या प्रगतीमुळे आपली पत वाढणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. उत्तराधर्आत वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. भावंडातील रुसवे फुगवे दूर होऊन सलोख्याचे संबंध होतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. शुभदिनांक ५, ६.

सिंह

WD

या आठवड्यात समोर आलेल्या संधीचा फायदा घ्या.सुखस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमणामुळे घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. कुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना मनाजोगे काम मिळेल. मित्रपरिवाराबरोबर सुग्रास भोजनाचे योग येतील. आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावणार्‍या घटना घडतील. शुभदिनांक ७.

कन्या

WD

उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी प्रवेश मिळेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. परदेशातील भावंडांशी सल्लामसलत करुन महत्वाचे निर्णय घेतले जातील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना मनाजोगे काम मिळेल. शुभदिनांक २.

तूळ

WD

आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण आपली आवक वाढविणारे आहे. अचनाक सामाजिक क्षेत्रातून सहलीचे बेत आखले जातील. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. परप्रांताशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित करता येतील. शेजार्‍यांचे सहकार्य लाभेल. शुभदिनांक ५.

वृश्चिक