साप्ताहिक राशीफल 1 ते 7 नोव्हेंबर 2015
मेष : व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविता येतील. आशावादी धोरण स्वीकाराल. मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत येतील. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. नवोदित कलाकारांना सुसंधी लाभतील. कला, साहित्य क्षेत्रातील लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक आवक वाढेल. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल.
वृषभ : नोकरी व्यवसायात आपले तत्व सोडून कोणतेही काम करु नका. नवीन करार करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. कोमत्याही कागदपत्रांवर सह्या करणे तूर्त टाळावे. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. मोठय़ा व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणार्या घटना घडतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. कामाची आखणी नियोजनबद्ध केल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष साधता येईल. आपले काम दुसर्यावर सोपवू नका.

