मंगळवार, 6 जानेवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
Last Modified:
बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (16:24 IST)
संबंधित माहिती
कशासाठी पोटासाठी
शतकानंतर आज पाहिली
लेझिम चाले जोरात
सदैव सैनिका...
देवाचे घर
कशासाठी पोटासाठी
कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी
चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक् शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी
उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दोन डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी
डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी? पोटासाठी !
कवी- माधव ज्यूलियन
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील
धार्मिक मान्यतेनुसार ‘ॐ’ सर्वात शक्तिशाली मंत्र मानले गेले आहे. त्यामुळे जो कोणी सकाळी उठल्याबरोबर या मंत्राचा जप करतो त्याला मानसिक शांतीसोबतच शारीरिक शक्तीही मिळते. ‘ॐ’ उच्चारणाने मन शांत होते. एकाग्रताही वाढते.
उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
तुम्हाला उत्तम करिअर करायचे असेल, तर पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त तुम्हाला इतर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. वास्तविक, केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहून कोणीही चांगले जीवन जगू शकत नाही, पुस्तकी ज्ञानाने नोकरी किंवा व्यासपीठ मिळू शकते, पण त्या व्यासपीठावर अधिक चांगली कामगिरी कशी करता येईल, पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त इतर काही महत्त्वाच्या गोष्टींचीही काळजी घ्या.अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला चांगले करिअर घडवण्यात खूप मदत करतात.जाणून घेऊया
तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या
कडाक्याच्या थंडीमुळे आणि वायू प्रदूषणाच्या धोक्यामुळे केवळ मानवांवरच नाही तर घरगुती वनस्पतींवर, विशेषतः तुळशीवरही हानिकारक परिणाम होत आहे. लोक सहसा थंडी किंवा दंव यामुळे तुळशी काळी पडते असे म्हणतात परंतु शहरांमध्ये वायू प्रदूषण वनस्पतींसाठी मूक हत्यार म्हणून काम करते.
साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026
मेष (२१ मार्च-२० एप्रिल) आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, विशेषतः उच्च अनिश्चिततेसह गुंतवणूक करताना. सोप्या आणि सुरक्षित पद्धती ताण कमी करतील. तुमच्या प्रियकरासोबत प्रवास केल्याने तुमच्या नात्यात जवळीक वाढेल. आरोग्य हळूहळू सुधारेल, परंतु वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. मालमत्ता किंवा वारसा व्यवहार करताना संयमी आणि तटस्थ वृत्ती ठेवा. कामांना प्राधान्य दिल्याने तुमचा वेळ आणि मन दोन्ही शांत राहण्यास मदत होईल. या आठवड्यात, तुमची शक्ती आणि सहनशक्ती वाढेल. कामावर लक्ष केंद्रित होईल आणि प्रत्येक कामाकडे वैयक्तिकरित्या लक्ष दिल्यास जबाबदाऱ्या सोप्या वाटतील. जुना कौटुंबिक वाद पुन्हा उद्भवू शकतो, म्हणून भावनिक संतुलन राखा. अनावश्यक गुंतागुंत टाळा, कारण यामुळे थकवा वाढू शकतो. भाग्यवान क्रमांक: ८ |भाग्यवान रंग: निळा
मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी
साहित्य तीळ गूळ तूप आवश्यकतेनुसार पाणी सुकामेवा
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
हिवाळ्यात चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल तर या 5 गोष्टी हळदीमध्ये मिसळून लावा
थंड हिवाळ्यातील वारे कोरड्या त्वचेला कारणीभूत ठरू शकतात, ज्यामुळे त्वचेवर खडबडीतपणा आणि लालसरपणा येतो, तसेच जळजळ देखील होते.
थंडीत आरोग्याची काळजी घ्या, या 5 टिप्स वापरून पहा
या हिवाळ्यात या 5 आरोग्य टिप्स वापरून पहा: थंड हवामानाचा परिणाम होऊ लागला आहे. हिवाळा सर्दी आणि फ्लू, ब्राँकायटिस आणि दमा, सायनुसायटिस, कोरडी त्वचा, संधिवात, चिलब्लेन्स, हायपोथर्मिया, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग अशा अनेक लोकांसाठी वाढता धोका घेऊन येतो. तर, थंडीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे 5 घरगुती उपाय वापरून पहा.
रात्रभरात भेगा पडलेल्या टाचा कशा बऱ्या करायच्या? हा उपाय तुमच्या टाचांना कमालीचा मऊ करेल
थंडीत त्वचा आणि टाचांना लवकर तडे जातात. जर तुम्ही चप्पल कमी घालत असाल आणि जास्त वेळा अनवाणी राहता, तर टाचांना भेगा पडण्याची समस्या उद्भवू शकते. टाचांवरील धूळ आणि घाण त्वचेला आणखी नुकसान पोहोचवते. कधीकधी भेगा पडलेल्या टाचांना भेगा पडतात आणि रक्तस्त्राव होतो, ज्यामुळे चालणे कठीण होते. जर तुम्हाला टाचांना भेगा पडत असतील, तर हे सोपे उपाय वापरून पहा. यामुळे तुमच्या टाचांना रात्रभर बरे करता येते आणि तुमच्या पायांची त्वचा देखील मऊ होते.
प्रेम व्यक्त करण्यासाठी या प्रपोजल टिप्स फॉलो करा
जर तुम्हाला कोणी आवडते आणि तुम्हाला तुमचे प्रेम कबूल करायचे असेल, तर काही प्रपोजल टिप्स नक्कीच फॉलो करा. हे तुमच्या क्रशला प्रभावित करू शकते आणि त्यांना तुमचे प्रेम स्वीकारण्यास भाग पाडू शकते.
हिवाळ्यात शेकोटी जीवघेणी ठरू शकते; थोडीशी निष्काळजीपणाही महागात पडू शकते.
जेव्हा शेकोटी पेटवली जाते तेव्हा कोळसा किंवा लाकूड जळते, ज्यामुळे धूर आणि कार्बन मोनोऑक्साइड निर्माण होतो. हा वायू दिसत नाही किंवा गंधहीन नाही. तो हळूहळू बंद खोलीत जमा होतो आणि व्यक्तीला ते कळत नाही. त्याच्या परिणामांमुळे डोकेदुखी, चक्कर येणे, उलट्या होणे, चिंता आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. जास्त वेळ संपर्कात राहिल्याने बेशुद्धी येते आणि जीवघेणी परिस्थिती देखील उद्भवू शकते.