1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालगित
  4. Bal Kavita Sadaiv Sainika Lyrics in Marathi

सदैव सैनिका...

सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे
सदा तुझ्यापुढे उभी असे निशा
सदैव काजळी दिसायच्या दिशा
मधून मेघ हे नभास ग्रासती
मधेच या विजा भयाण हासती
दहा दिशांतुनी तुफान व्हायचे
सदैव सैनिका पुढेच जायचे
प्रलोभने तुला न लोभ दाविती
न मोहबंधने पदांस बांधिती
विरोध क्रोध वा तुला न थांबवी
न मोह भासतो गजान्त वैभवी
न दैन्यही तुझे कधी सरायचे
सदैव सैनिका पुढेच जायचे 
 
कवी - वसंत बापट
पुढील लेख
परफ्यूम स्प्रे केल्याने त्वचा काळी पडते का? तुम्ही मानेवर लावत असाल तर नक्की वाचा