Festival Posters
✕

फळांच्या एकतेची कहाणी

Updated: मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (13:00 IST)
 
बागेमध्ये सर्वात जुने आणि मोठे आंब्याचे झाड होते. त्याचे नाव ‘आंबा राजा‘ असे होते. राजा आंब्याने आपल्या चारही बाजूला लागलेल्या इतर फळांच्या झाडांना आपल्या छत्रछाया सांभाळत होते. आंब्याच्या झाडाचे फळ खूप गोड आणि रसदार होते. प्रत्येक जण त्यांना खाऊन आनंदित व्हायचे.  
 
आंब्याच्या बाजूला एक छोटेसे सफरचंदाचे झाड होते. सफरचंदाचा रंग लाल आणि सुंदर होता. सफरचंदाचे झाडाला नेहमी वाटायचे की, मी देखील आंब्याच्या झाडाप्रमाणे मोठे आणि घनदाट, मजबूत असावे. तसेच सफरचंदाला आपल्या गोडवा आणि रंगावर गर्व होता.  
 
एकदा एक नवीन झाड बागेमध्ये लावण्यात आले. हे झाड होते डाळींबाचे. डाळींब हे चवीला स्वादिष्ट लागते. डाळींबाच्या झाडाचे सर्व झाडांनी स्वागत केले. तसेच त्याला बागेतील नवीन सदस्य बनवले. 
 
एकदा खुप जोऱ्याचे वादळ आले. सर्व झाडे खूप घाबरली. आंब्याच्या फांद्यांनी इतर छोट्या झाडांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण वादळामुळे झाडे वाकायला लागली. तेव्हा डाळींबाने आपल्या मुळा घट्ट रोवून उभा राहिला. व जवळच्या इतर झाडांना देखील आधार दिला.
 
वादळ गेल्यानंतर राजा अंबाने डाळींबाचे कौतुक केले व म्हणाला की, “तुझ्या या धाडसासाठी आमच्याकडून तुला धन्यवाद! तू आम्हाला शिकवले खरी ताकत आकारात नसते तर हृदयात असलेल्या अंतरिशक्ति मध्ये असते.
 
यानंतर बागेतील सर्व झाडे एकमेकांचा आदर करू लागली. व आनंदाने राहू लागली. आंबा राजाला सफरचंद, केळी, पेरू आणि डाळिंब या सर्वांवर समान प्रेम आणि आदर होता. प्रत्येकाला समजले की प्रत्येक फळाची स्वतःची एक विशेषतः असते आणि ही विविधता बागेचे खरे सौंदर्य आहे.
 
अश्याप्रकारे सुंदर बाग सर्व फळांची एकता आणि प्रेमाचे प्रतीक बनली. तिथली सगळी फळं त्यांच्या चवीसाठीच नव्हे तर परस्पर प्रेम आणि पाठिंब्यासाठीही प्रसिद्ध झाली.
 
तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, एकतेचे बळ अनेक संकटांवर मात करते. 

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

नवरात्रीच्या उपवासासाठी राजगिरा लाडू घरीच कसे बनवायचे? पाक न करता सोपी पद्धत

ही रोपे आता लावा, हिवाळ्यात तुमची बाग रंगीबेरंगी फुलांनी बहरून जाईल

प्रेरणादायी कथा : विश्वास आणि विश्वासघात; गोष्ट ससा आणि चार मित्रांची

नव्या पिढीने वाचायलाच हव्यात अशी १० मराठी पुस्तके

घरीच कुरकुरीत आणि मसालेदार ''नाचणीचे चिप्स'' बनवा, चव अशी की प्रत्येकजण रेसिपी विचारेल

पुढील लेख
Show comments