Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Lemon Storage Tips लिंबू 3 महिने साठवून ठेवायचे असतील तर या टिप्स फॉलो करा

Updated: मंगळवार, 25 जुलै 2023 (12:12 IST)
लिंबाचा रस साठवण्यासाठी साधारण 1 किलो लिंबाचा रस काढून गाळून घ्या.
जर लिंबाचा रस 500 ग्रॅम असेल तर त्यात 600 ग्रॅम साखर मिसळा.
लिंबाचा रस आणि साखर नीट मिसळून काचेच्या बरणीत ठेवा.
जार घट्ट बंद असल्याची खात्री करा.
हे केल्यावर आपण हे फ्रिजमध्ये बर्याच काळासाठी ठेवू शकता.
 
लिंबू ब्राऊन पेपर किंवा एल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ठेवा
तुम्हालाही लिंबू जास्त काळ ताजे ठेवायचे असेल तर प्रथम लिंबू स्वच्छ धुवा आणि स्वच्छ कपड्याने पुसून टाका.
आता लिंबू एका ब्राऊन पेपरच्या पिशवीत किंवा टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा आपण लिंबू एल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळू शकता.
आता याला प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवा आणि बॉक्सचे झाकण व्यवस्थित बंद करा.
यानंतर प्लास्टिकचा बॉक्स फ्रीजमध्ये ठेवा.
असे केल्याने लिंबू जास्त काळ ताजे राहतील.
 
मीठ आणि लिंबू एकत्र ठेवा
तुम्हालाही लिंबू तीन ते चार महिन्यांसाठी साठवायचे असतील तर लिंबाचे चार तुकडे करून काचेच्या बरणीत ठेवा. नंतर बरणीच्या वरती मीठ टाका आणि चांगले मिसळा. यामुळे लिंबू लवकर खराब होण्यापासून बचाव होईल. मात्र बरणीमध्ये ठेवल्यास काही दिवसांनी लिंबाचा रंग नक्कीच बदलतो. पण ते खूप ताजे राहील.
 
लिंबावर नारळ तेल लावा
जर तुम्हाला लिंबू एक ते दोन महिने ताजे ठेवायचे असतील तर लिंबाला खोबरेल तेल व्यवस्थित लावा. यानंतर काचेच्या बरणीत भरून ठेवा. खोबरेल तेल लावल्यानंतरच लिंबू फ्रीजमध्ये ठेवा. असे केल्याने लिंबू जास्त काळ खराब होत नाही.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

कपाटात कपडे असूनही ‘काय घालायचं?’ प्रश्न पडतोय? या 5 Styling Tips वापरा

तुम्हीही रात्री फोन उशीजवळ ठेवता? मग हे नक्की वाचा

गणपती सजावटीसाठी यंदाचे 7 भन्नाट ट्रेंड; घर दिसेल एकदम हटके!

लघु कथा : सोन्याची वीट; गोष्ट कंजूस माणसाची

स्वयंपाकघरात काम करताना महिलांनी या 5 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये

पुढील लेख
Show comments