रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमगीत
Written By वेबदुनिया|

जपून चाल्‌ पोरी जपून चाल्‌

जपून चाल्‌ पोरी जपून चाल्‌
बघणाऱ्या माणसाच्या जिवाचे हाल्‌ !

लाडाने वळून बघायची खोड्‌
नाजूक नखऱ्याला नाही या तोड्‌
डोळ्यांत काजळ, गुलाबी गाल्‌ !

केसात सुरंगी रंगात ग
विजेची लवलव अंगात ग
खट्याळ पदराला आवर घाल्‌ !

जिंकीत जिंकीत जातेस तू
ज्वानीचं गाणं हे गातेस तू
हासून होतेस लाजून लाल्‌ !

उरात लागलेत नाचाया मोर्‌
कोणाच्या गळ्याला लागेल दोर्‌ ?
माझ्या या काळजाचा चुकेल ताल्‌ !