सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (17:33 IST)

ऑफिसमधून आल्या आल्या पार्टनरशी या गोष्टी करणे टाळावे

प्रत्येक गोष्ट सांगण्याची एक वेळ असते असे म्हणतात. कधीकधी, जेव्हा चुकीच्या वेळी योग्य गोष्ट सांगितली जाते, तेव्हा ती चुकीची वाटते. अशा परिस्थितीत नातेसंबंधातही अशा गोष्टी महत्त्वाच्या असतात, ज्या तुमच्या जोडीदारासाठी वाईट ठरू शकतात. कधीकधी योग्य वेळ न मिळाल्याने योग्य गोष्ट देखील जोडीदाराला चुकीची वाटू लागते. उदाहरणार्थ, जेव्हा पार्टनर बाहेरून किंवा ऑफिसमधून येतो, तेव्हा काही गोष्टी त्यांना सांगायला टाळल्या पाहिजेत.
 
आल्यावर तक्रार करणे
जर तुम्हाला तुमच्या पार्टनरबद्दल काही वाईट वाटले असेल किंवा सकाळी तुमची काही तक्रार असेल तर ऑफिसमधून येताच पार्टनरच्या चुकांची तक्रार करू नका. असे केल्याने तणाव वाढेल आणि तुमच्या दोघांमध्ये भांडण होऊ शकते.

कोणाबद्दल वाईट बोलणे किंवा गप्पाटप्पा
प्रत्येक गोष्ट करण्याची एक वेळ असते. ऑफिसमध्ये अशा अनेक गोष्टी असू शकतात, ज्यामुळे तुमच्या पार्टनरचा मूड ऑफ होऊ शकतो, त्यामुळे पार्टनर येताच कोणाच्याही गप्पा, नातेवाईक किंवा शेजाऱ्याच्या वाईट-साईट गोष्टी सांगत बसू नका.
 
जोडीदार येताच त्याला कोणतेही काम सांगू नका
बाहेरून आल्यावर व्यक्ती खूप थकलेली असते. अशा स्थितीत काही वेळ विश्रांती घेतल्यानंतरच जोडीदाराला काही काम करायला सांगा. तुम्ही येताच तुमच्या पार्टनरला काही काम सांगितले तर त्यांचा मूड खराब होईल.
 
घरगुती बजेट किंवा खर्चावर वाद
घराच्या बजेट किंवा खर्चाबद्दल बोलणे देखील महत्वाचे आहे, परंतु ही गोष्ट करण्याची देखील एक वेळ आहे, म्हणून घरचे बजेट किंवा पैसे हिशेब येताच बसू नका. असे केल्याने, जोडीदार तणावाखाली येऊ शकतो.