गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: सोमवार, 19 जून 2023 (22:12 IST)

Blind Date Tips ब्लाइंड डेट एन्जॉय करण्यासाठी हे करा

ब्लाइंड डेट नवीन शौक आहे. ही डेट रोमांचित करते पण काही लोकं धोका पत्करायला घाबरतात म्हणून या डेटपासून लांबच राहतात. ब्लाइंड डेट म्हणजे यात दोघांही एकमेकाबद्दल काही माहीत नसतं. जाणून घ्या सहा अश्या टिप्स ज्या ब्लाइंड डेटवर जाणार्‍यांसाठी उपयोगी ठरतील.
 
खोटं बोलू नका
डेट ब्लाइंड असली तरी उगाचच फेकू नका म्हणजे स्वत:चा स्वभाव, नोकरी, लग्नाबद्दल उगाचाच खोटं-नाटं मांडू नका. कारण कधी न कधी खरं कळल्यावर आपलं इम्प्रेशन बिघडू शकतं.
 
विनम्र राहा
आपल्या ब्लाइंड डेट विनम्र राहा. अश्या डेटमुळे आपण ऑकवर्ड फील करत असाल तर समोरचाही त्याच परिस्थितीत असेल याचा विचार करा. सन्मानाची इच्छा असल्यास समोरच्याचा सन्मान करा.
 
वेळेवर पोहचा
ठराविक वेळेपूर्वी पोहचल्यावर रिलॅक्स फील कराल. भेटीपूर्वी मानसिक रूपाने तयार व्हाल. उशिरा पोहचाल तर आपल्याला वेळीची किंमत नाही कळून येईल तसेच आपल्याला समोरच्याला भेटण्यात खास रस नाही असेही वाटेल.
 
टॉकिंग टॉपिक
बोलण्याचा विषय सामान्य असावा. कारण ब्लाइंड डेट असल्यामुळे आवड-निवड माहीत असणे अशक्यच असतं. कुणाला वाईट वाटेल अश्या विषयावर बोलण्यापूर्वी सहमती घेऊन घ्या.
 
ओपन माइंड
पूर्वाग्रह बाळगून गेलास तर निराशा होऊ शकते. समोरचा कसा असेल हे गृहीत धरू नका. डेटवर आलाच आहात तर आनंदाने वेळ निभावून घ्या.
 
अती उत्साह किंवा अती नर्व्हसनेस नको
आपली बॉडी लँग्वेज आपल्या मनातला आरसा असते. ब्लाइंड डेटवर सहज राहणे आवश्यक आहे. अती उत्साह किंवा अती नर्व्हस होऊन चालणार नाही. स्वत:ला संयमित ठेवा.