Festival Posters
✕

Friend Crush प्रेम नाही, तरीही त्या व्यक्तीची ओढ! तरुणाईमध्ये सध्या चर्चेत असलेला 'फ्रेंड क्रश' ट्रेंड नेमका काय आहे?

Updated: बुधवार, 18 नोव्हेंबर 2026 (13:12 IST)
 
विशेष म्हणजे, फ्रेंड क्रशमध्ये आकर्षण असते; पण ते नेहमीच रोमँटिक किंवा शारीरिक आकर्षण असेल असे नाही. एखाद्याचा स्वभाव, बोलण्याची पद्धत, विचार, आत्मविश्वास किंवा सकारात्मक ऊर्जा आपल्याला आवडू शकते. त्यामुळे त्या व्यक्तीशी मैत्री करण्याची इच्छा निर्माण होते.
 
फ्रेंड क्रश आणि रोमँटिक क्रश यामध्ये काय फरक आहे?
दोन्ही भावनांमध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण आणि उत्सुकता असू शकते. मात्र, त्यामागचा उद्देश वेगळा असतो. फ्रेंड क्रशमध्ये आकर्षण असतं मात्र मैत्री करण्याची इच्छा असते आणि अपेक्षा चांगला मित्र किंवा मैत्रीण मिळावी असा असतो. ज्याच्यासोबत गप्पा, फिरणे, आवडी शेअर करणे आणि जवळीक राहण्याची असल्याची भावना असते. या उलट रोमँटिक क्रश मध्ये प्रेमसंबंध असावे असे आकर्षक असते. पार्टनर म्हणून फिरावे अशी अपेक्षा तसेच सोबत रोमँटिक वेळ घालवण्याची अपेक्षा असते आणि प्रेमाची किंवा रोमँटिक जवळिकीची ओढीची भावना मनात असते.
 
फ्रेंड क्रशसाठी इंग्रजीमध्ये Platonic Attraction किंवा Squish असे शब्दही वापरले जातात. ही मैत्रीच्या नात्याची तीव्र इच्छा दर्शवणारी संकल्पना आहे.
 
फ्रेंड क्रश असल्यास काय करावे?
तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल अशी भावना असेल, तर त्यात गैर काहीच नाही. मात्र, मैत्रीची सुरुवात करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
संवादाची सुरुवात करा: एखाद्या समान आवडीच्या विषयावर सहज बोलायला सुरुवात करा.
मैत्रीचा दबाव टाकू नका: समोरच्या व्यक्तीलाही मैत्रीमध्ये रस असणे आवश्यक आहे.
स्वतःसारखेच राहा: समोरच्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी स्वतःचा स्वभाव बदलू नका.
समोरच्याच्या भावनांचा आदर करा: प्रत्येक व्यक्तीला मैत्री करायचीच असेल असे नाही. त्यामुळे तिच्या वैयक्तिक अवकाशाचा आदर करा.
 
प्रत्येक आकर्षणाला प्रेमाचे नाव देणे गरजेचे आहे का?
नाही! एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आवडणे, तिच्यासोबत वेळ घालवण्याची इच्छा होणे किंवा तिच्यासारखे मित्र आपल्या आयुष्यात असावेत असे वाटणे या नैसर्गिक भावना आहेत. फ्रेंड क्रश ही संकल्पना याच गोष्टीची आठवण करून देते की प्रत्येक आकर्षणाचा शेवट प्रेमसंबंधांमध्येच झाला पाहिजे असे नाही. काही नाती मैत्री म्हणूनही तितकीच सुंदर असू शकतात. थोडक्यात सांगायचे तर प्रेमात पडण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचा चांगला मित्र होण्याची इच्छा म्हणजे फ्रेंड क्रश!

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Friend Crush प्रेम नाही, तरीही त्या व्यक्तीची ओढ! तरुणाईमध्ये सध्या चर्चेत असलेला 'फ्रेंड क्रश' ट्रेंड नेमका काय आहे?

काळाकुट्ट आणि चिकट झालेला तवा करा मिनिटांत चकाचक! लिंबू आणि मीठाची भन्नाट ट्रिक

चेहऱ्यावर हवाय झटपट नॅचरल ग्लो? स्वयंपाकघरातील 'या' २ पदार्थांपासून बनवा घरगुती फेसपॅक

चपातीला तूप लावून खाणं फायदेशीर की घातक? वेटलॉससाठी तूप खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत जाणून घ्या

कार्तिकी एकादशीनिमित्त खास नैवेद्याच्या पारंपारिक पाककृती Kartiki Ekadashi Naivedyam

पुढील लेख
Show comments