बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: बुधवार, 8 जानेवारी 2025 (11:57 IST)

अचानक कोणी प्रपोज केले तर नकार कसा द्यायचा ?

Propose Day
अनेक वेळा शाळा किंवा कॉलेजमध्ये मुलांना किंवा मुलींना प्रस्ताव येतात. जर तुम्ही सर्वगुण संपन्न किंवा दिसायला स्मार्ट आणि सुंदर असाल तर तुम्हाला प्रपोजल येणे साहजिक आहे. कोणाला तुमची स्टाइल आवडू शकते तर कोणाला तुमच्या बोलण्याची शैली तर कोणाला तुमचे टॅलेंट आवडू शकतं. आकर्षण किंवा प्रेमासाठी कारणे कुठलीही असो पण जर कोणी तुमच्यावर प्रेम करत असेल किंवा तुम्हाला प्रपोज केले तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्हीही त्याच्यावर प्रेम करायला सुरुवात करावीच लागेल.
 
आपण खरोखर फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम करतो आणि इतर सर्वांबद्दल फक्त आकर्षण असते. पण विचार करा, जर कोणी अचानक येऊन तुम्हाला प्रपोज केले तर तुम्ही त्याला कसे सामोरे जाल? कोणाचाही प्रस्ताव सरळपणे नाकारणे योग्य नाही, तुम्हाला ही परिस्थिती विचारपूर्वक हाताळावी लागेल. तुमचा होकार असेल तर प्रश्नच नाही परंतु नकार असेल तर समोरच्याला समजावून सांगावे लागेल की तुमच तिच्यावर किंवा त्याच्यावर प्रेम नाही, त्याने मूव्ह ऑन करावे. 
 
प्रपोज करणार्‍याला वाईट दृष्टीने बघू नये कारण प्रेम किंवा आकर्षण असणे त्याचा अर्थ असा नाही की समोरची व्यक्ती घाणेरडा, वाईट आणि नालायक आहे.
 
साधी गोष्ट अशी आहे की कोणाला तरी तुमच्याबद्दल आकर्षण वाटला आणि त्याने किंवा तिने सांगितलं. हे पुढे तुमच्या समजुतीवर आहे की तुम्ही ते कसे हाताळता. सर्व प्रथम, परिस्थिती समजून घ्या, समोरच्याबद्दल जाणून घ्या आणि पटवून द्या आणि मग नकार द्या. यासाठी काही खास टिप्स-
 
थेट नकार : एखाद्याचा प्रस्ताव न स्वीकारण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. जर कोणी तुम्हाला मेसेज किंवा चॅटवर आपले प्रेम व्यक्त केले, तर त्याच क्षणी ते थेट शब्दात नकार असल्याचे कळवा. या पद्धतीत तुम्हाला कोणताही तपशील देण्याची गरज नाही, कोणत्याही मीटिंगची आवश्यकता नाही. रस्त्यावरील लोकांशी अनेकदा अशा पद्धतीने वागले जाते.
मैत्री करा : जर तुम्हाला असे वाटत असेल की ज्याने तुम्हाला प्रपोज केले आहे ती व्यक्ती चांगल्या मैत्रीच्या लायकीची आहे तर सांगा की आपण चांगले मित्र होऊ शकतो. मैत्रीचा हात पुढे करा. मैत्री करण्यात काही नुकसान नाही, कारण अनेक वेळा आपल्याला प्रपोज करणा-या व्यक्तीला आपण वाईट समजतो आणि त्याच्याशी मैत्रीही करत नाही, तर तो चांगला मित्र बनू शकतो. 
 
रागावणे : जर तुम्ही एखाद्याला एकदा नकार दिला असेल आणि समजावून सांगितले असेल, परंतु तरीही कोणीतरी तुमचा पाठलाग करत असेल, तुम्हाला वारंवार त्रास देत असेल, तर त्याच्याशी रागाने बोला, त्याच्याकडे तिरस्काराने पाहा, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना सांगा आणि सांगा स्पष्ट करा की तुम्ही त्याच्यावर अजिबात प्रेम करत नाही.
 
इग्नोर करा : जर कोणी तुमच्यावर प्रेम करत असेल आणि तुम्हाला तो आवडत नसेल तर इग्नोर करायला सुरुवात करा. कळत-नकळत ही गोष्ट पटवून द्या की तुम्हला समोरच्यात काहीही रस नाही. जास्त बोलण्याची गरज नाही पण आपले विचार आणि भावना स्पष्टपणे व्यक्त करणे महत्वाचे आहे.
लाइट अॅक्ट करा : जर तुम्हाला कोणी मित्राने प्रपोज केले असेल तर त्यासमोर थोडा अभिनय करा, त्याला सांगा की तू असा विचार करत असशील कधीच वाटले नव्हते. मी तुला एक चांगला मित्र मानत होते आणि तरीही तू फक्त एक चांगला मित्र आहेस, मला माझा चांगला मित्र गमावायचा नाही.
 
सोशल सर्किलपासून वेगळे करा : जर कोणी तुम्हाला प्रपोज करत असेल आणि तुम्हाला तो आवडत नसेल किंवा तुम्हाला आणखी कोणतेही नाते वाढवायचे नसेल तर त्याला लगेच तुमच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवरुन वेगळे करा. त्याला अनफॉलो करा. तुमच्या मित्रांनाही सांगा की त्यांच्याशी माझ्याबद्दल बोलू नका.