Dharma Sangrah

Sugar Daddy कोण असतात? तरुण मुलींना का हवे असतात शुगर डॅडी?

Updated: बुधवार, 2 जुलै 2025 (15:14 IST)
 
शुगर डॅडीज कोण असतात?
शुगर डॅडीज म्हणजे असे आर्थिक दुष्ट्या सक्षम पुरुष जे त्यांच्या अर्ध्यापेक्षा कमी वयाच्या मुलींना डेट करतात. मुलीला शुगर बेबी म्हणतात. कारण हे एक प्रकारचे परस्पर संबंध आहे, शुगर डॅडीज त्यांच्या शुगर बेबीला आर्थिक मदत करतात आणि तिच्या सर्व गरजा पूर्ण करतात.
 
मुलींना का हवे असतात शुगर डॅडी?
मुली फक्त त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शुगर डॅडीज शोधतात. त्या बदल्यात, ते जेव्हा त्यांना हवे तेव्हा त्यांच्या शारीरिक किंवा इतर गरजा पूर्ण करतात. Sugar daddy सहसा आर्थिकदृष्ट्या सक्षम असतो आणि sugar baby ला पैसे, भेटवस्तू, प्रवास किंवा इतर सुविधा पुरवतो.
यात अनेकदा तरुण मुलीचे शिक्षण, राहणीमान किंवा इतर खर्च उचलण्याच्या बदल्यात वयाने मोठ्या माणसासोबत स्वइच्छेने वेळ घालवते.
 
शुगर डेटिंगचा ट्रेंड का वाढत आहे?
सामान्य डेटिंगपेक्षा, या डेटिंगमध्ये येणाऱ्या काही मुली पैशाच्या गरजेमुळे शुगर बेबीज बनतात, तर काही मुली त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी शुगर बेबीज बनतात. त्याचप्रमाणे, ज्या पुरुषांना त्यांच्या जोडीदाराकडून समाधान मिळत नाही किंवा ज्यांच्या शारीरिक गरजा जास्त असतात ते शुगर डॅडीज बनतात. याचा आणखी एक पैलू असा आहे की कधीकधी त्यांच्यामध्ये भावनिक संबंध देखील तयार होतो. हा संबंध दोघांसाठी फायदेशीर असतो. शुगर बेबीला आर्थिक मदत मिळते, तर शुगर डॅडीला साथ, आर्कषण, प्रेम किंवा इतर अपेक्षित गोष्टी मिळतात.
ALSO READ: Dink Couples तरुणांमध्ये 'डिंक कपल्स' ची क्रेझ झपाट्याने वाढत आहे, जाणून घ्या हा ट्रेंड आणि याचे कारण
शुगर डेटिंगचा एक वेगळा पैलू
असे संबंध सहसा स्पष्ट करारावर आधारित असतात, जिथे दोन्ही पक्षांच्या अपेक्षा आधीच ठरलेल्या असतात.
समाजात अशा नात्यांना नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते, तर काही ठिकाणी हे वैयक्तिक निवड मानली जाते.
अनेकदा असे घडते की आपण एखाद्याशी बोलतो आणि प्रेमात पडतो, त्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीशी बोलायला आवडते. शुगर डेटिंगमध्येही असेच काहीसे घडते. समाजात याकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जात असले तरी, काही तरुण मुली किंवा मोठे पुरुष एकमेकांच्या प्रेमात पडतात असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अशा परिस्थितीत, प्रेमात पडण्याची शक्यता असते.
 
शुगर डॅडी शब्द कुठून आला?
असे सांगितले जाते की शुगर डॅडी हा शब्द पहिल्यांदा वापरात आला जेव्हा कॅलिफोर्नियातील शुगर कंपनीचे मालक अॅडॉल्फ स्प्रेकेल्स यांनी १९०८ मध्ये त्यांच्यापेक्षा २४ वर्षांनी लहान असलेल्या महिलेशी लग्न केले.
 
टीप: अशा नात्यांमध्ये कायदेशीर आणि नैतिक बाबींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. काही देशांमध्ये यासंबंधी कायदे कठोर असू शकतात. हा विषय संवेदनशील असू शकतो, त्यामुळे याबाबत चर्चा करताना परस्पर आदर आणि संमती यांना प्राधान्य द्यावे.
 
अस्वीकार: हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.
ALSO READ: स्त्रियांना का आवडतात वयाने मोठे पुरूष

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

शरीरात ही ५ लक्षणे दिसल्यास कावीळ होण्याचा धोका संभवतो, उपाय जाणून घ्या

बीटेक इन मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता पगार जाणून घ्या

पावसाळ्यात चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जाणून घ्या

चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी हसण्याचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments