आज आपण देशाचे पंतप्रधान व देशात तसेच विदेशात सर्वात लोकप्रिय नेते असणारे नरेंद्र मोदींविषयी सामान्य लोकांना माहित नसणाऱ्या गोष्टी जाणून घेऊयात.
१७ सप्टेंबर १९५० ला गुजरात च्या वादनगर मध्ये दामोदरदास मूलचंद व हीराबेन यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. तो मुलगा पुढे जाऊन गुजरातचा मुख्यमंत्री व नंतर देशाचा पंतप्रधान बनला. तो मुलगा म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.
ज्योतिशास्त्रानुसार नरेंद्र मोदी यांची कुंडली बाल गंगाधर टिळक यांच्याशी मिळती-जुळती आहे.
१९५८ मध्ये दिवाळी च्या दिवशी गुजरात मधील काही मुलांनी बाल स्वयंसेवक बनण्याची शपथ घेतली होती, त्यापैकी ८ वर्षाचा एक मुलगा नरेंद्र मोदी होते.
नरेंद्र मोदींनी गुजरात च्या वादनगर रेल्वे स्टेशनवर चहा विकला आहे. तरुणपणी ते आपल्या भावासोबत चहाचा स्टॉल चळवत होते. इंडो-पाक युद्धादरम्यान त्यानी रेल्वे स्टेशनवर सैनिक बनून सेवा देखील केली आहे.
लहानपणी मोदी घरजवळच्या तलावामधून एक मगर पकडून घरी घेऊन आले होते, नंतर आईच्या सांगण्यावरून मोदी त्या मगरीला पाण्यात सोडून आले.
मोदी पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला आहे.
मोदींनी अमेरिकेतून मैनेजमेंट व पब्लिक रिलेशन संबंधित ३ महिन्यांचा कोर्स केला होता.
मोदी शाकाहारी आहेत, तसेच ते सिगारेट व दारू ह्यापासून लांब असतात.
मोदींचा वार्षिक पगार १९ लाख रुपये इतका आहे.
मोदी कोणतंही नवीन काम करण्याआधी आपल्या आईचा आशीर्वाद घेतात, व स्वामी विवेकानंद यांना आपला आदर्श मानतात
२००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्याच्या आईने त्याना सांगितले होते कि ” बेटा कभी रिश्वत मत लेना”.
गुजरात चे मुख्यमंत्री असताना मोदींनी १३ वर्षाच्या कार्यकाळात एकही सुट्टी घेतली नव्हती.
जेव्हा नरेंद्र मोदी अहमदाबाद संघ मुख्यालय मध्ये राहत होते तेव्हा ते सर्व लहान-मोठी कामे करायचे, जसे कि साफ-सफाई, चहा बनवणे, बुर्जुग नेत्यांचे कपडे धुणे इत्यादी.
RSS चे प्रचारक दाढी ठेवू शकत नाहीत, परंतु मोदी दाढी ठेवत होते.
मोदी पोस्ट ग्रेजुएट आहेत, त्यांनी Political Science मध्ये M.A केलं आहे.
१९७५ च्या आणीबाणीच्या काळात RSS सारख्या संस्थांवर प्रतिबंध लावला होते, त्यावेळी मोदी वेष बदलून राहत होते.
२००५ च्या गुजरात दंगलीमुळे व भारतातील अनेक लोकांच्या विरोधामुळे २००५ ते २०१३ पर्यंत अमेरिकेने मोदींना व्हिसा दिला नव्हता, परंतु मोदींची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर अमेरिकेने त्याना स्वतःहून बोलावून घेतले.
२००१ मध्ये मोदींची निवड केशुभाई पटेल यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली व ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. राजकीय दबावामुळे त्यानी २००२ मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, परंतु त्याच वर्षी ते मुख्यमंत्री म्हणून बहुमताने निवडून आले. त्यांनतर ते २००७ व २०१२ मध्ये देखील मुख्यमंत्री म्हणून बहुमताने निवडून आले. त्यांनी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून सलग २०६३ दिवस काम केलं.
नरेंद्र मोदींना टेक्नॉलॉजिचा वापर जास्त आवडते, त्यानी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात पहिल्यांदा 3D टेक्नॉलॉजिचा वापर करून भाषण दिले होते.
नरेंद्र मोदींनी अनेक वेळा सांईगतलं आहे कि ते फक्त ५ तासांची झोप घेतात व सकाळी ५:३० ला उठतात.
नरेंद्र मोदी मोवाडो ह्या स्वित्झर्लंडच्या प्रसिद्ध कंपनीच घड्याळ वापरतात, ह्या घड्यळांची किंमत ४० हजार ते १ लाख ९० हजारापर्यंत असते. मोदी नेहमी उजव्या हातात घडयाळ घालतात असं करणं ते शुभ मानतात.
नरेंद्र मोदी मों ब्लां ह्या जर्मनीच्या प्रसिद्ध कंपनीचे पेन वापरतात, ह्या पेनाची किंमत १ लाख ३० हजार इतकी आहे. अमिताभ बच्चन, बराक ओबामा, दलाई लामा, वारेन बफे यांसारखे प्रसिद्ध लोक ह्या कंपनीचे पेन वापरतात.
नरेंद्र मोदी बुल्गरी ह्या इटलीच्या प्रसिद्ध ब्रॅण्डचा चष्मा वापरतात. ह्या कंपनीच्या चष्म्याच्या किंमती ३० ते ४० हजार इतक्या असतात.
नरेंद्र मोदींचे कपड़े बिपिन व जीतेंद्र चौहान यांच्या दुकानामध्ये बनवली जातात. १९८९ पासून नरेंद्र मोदी ह्यांच्याकडून कपडे शिवून घेतात. हे दुकान काही लहान-मोठं नाहीये, ह्यांची अहमदाबाद मध्ये जेड ब्लू नावाची १५० कोटींची कंपनी आहे. मोदी स्वतः त्याच्या सूटचा फैब्रिक, कलर व डिजाइन निवडतात.
नरेंद मोदी फेसबुक व ट्विटर वरती सर्वात जास्त Fallow केले जाणारे नेते आहेत. ट्विटर वर त्यांचे जवळ-जवळ ३ कोटी ७० लाख follower आहेत.
नरेंद्र मोदी भारतचे १५ वे पंतप्रधान आहेत, त्यानी २६ मे २०१४ ला भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
मोदींना भेटस्वरूपात ज्या वस्तू मिळतात त्यांचा ते वारसातून एकदा लिलाव करतात व त्यामधून मिळणारे पैसे सामाजिक संस्थांना दान म्हणून देतात.
BJP ने पहिल्यांदाच लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वखाली पूर्ण बहुमत प्राप्त केलं आहे. आतापर्यंत कांग्रेस व भाजप असे दोनच पक्ष लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमत प्राप्त करू शकले आहेत.
मोदी त्या १७ लोकांपैकी आहेत ज्यांना जपानचे पंतप्रधान “Shinzo abe” ट्विटरवर Follow करतात.
नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अमिताभ बच्चन यांना गुजरात टुरिझम चा ब्रांड अंबेसडर बनवलं होत. अमिताभ बच्चन यांनी अनेक जाहिरातींमधून गुजरातच्या पर्यटनाचा प्रचार केला, ह्यसाठी अमिताभ बच्चन यांनी कोणतंही मानधन घेतलं नव्हते.