1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
  4. nonveg recipe

मुर्ग मलई करी

मुर्ग मलई करी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : 800 ग्रॅम चिकन, 200 ग्रॅम चिरलेला कांदा, 100 ग्रॅम काजू पेस्ट, 100 ग्रॅम क्रीम, 200 ग्रॅम तिखट, मीठ चवीनुसार, 10 ग्रॅम पुदिना, 10-12 हिरव्या मिरच्या, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, 100 ग्रॅम तेल. 

कृती : सर्वप्रथम कांद्याला तेलात सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावे, त्यात आलं-लसणाची पेस्ट टाकून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात काजू पेस्ट, तिखट, हिरव्या मिरच्या घालून चांगले एकजीव करावे. त्यात चिकनचे तुकडे टाकून शिजवावे व मीठ घालावे. चांगले शिजल्यावर क्रीम टाकावे. पुदिन्याच्या पानांनी सजवून सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा