- लाईफस्टाईल
» - मराठी साहित्य
» - मराठी कविता
ती
- मनोहर धडफळे
ती रुसली होती माझ्यावरकां? कुणास ठाऊक?मी आर्त स्वरांत तिला साद घालीत होतोविरह वेदना मला जाळीत होत्या.अखेर दमलोडोळे मिटून, डोके दाबून बसलो मात्रक्षण-दोनच क्षण-अनअकस्मात ढगांचा गडगडाटऐकू येऊ लागलाविजा चमकू लागल्यावादळ वारे वाहू लागलेदारं खिडक्या यांची तावदानंआत बाहेर होऊ लागलीतअन... अन ती आलीमला कडकडून भेटली
अन लेखणी सरसावूनमी लिहायला सुरुवात केलीभराभर लिहू लागलो.आता ती आली आहे ना!तीच जिची मीआतुरतेने वाट पहात होतोती आली...ती स्फुर्ती आली.