Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बालपणीचा काळ सुखाचा

Updated: गुरूवार, 4 एप्रिल 2019 (11:53 IST)
 
चालता चालता त्याच फुफाटयातला बाबळीचा निबरढोक जुन काटा 
काचदिशी पायात मोडून मस्तकात कळ जायची.
 
मोडलेला काटा काढायला काटयाची पांजर शोधत लंगडत भीरी भीरी हिंडायचो.
तिथंच रस्त्याकडेला मांडी घालुन पायाला थुका लावून काटा काढायला घ्यायचो.
 
काढलेला काटा तळहातावर घेवून पापणीचा केस खसकन तोडायचो.
तोडलेला पापणीचा केस काटयाला चिकटवून हळूहळू वर ऊचलायचो..
काटा ऊचलून वर यायचा...भारी वाटायचं
 
तेव्हा पापणीच्या केसानेही वेदना हलकी व्हायची.काटयासारखी...
 
कारण तेव्हा व्यवहाराचा स्पर्श नं झालेली निरागस स्वप्नं होती डोळ्यात..
 
ऊन्ह तेव्हाही होतंच की..
 
आता डोक्याला कॅप, डोळ्यावर गौगल चढवूनही ऊन्ह लागतं.
 
भौतिकाची बाधा झाली की सावलीही सलू लागते.
ऊन्हाची तर गोष्टच वेगळी....
बालपणीचा काळ सुखाचा
रस्त्याने जाताना येणारी माझी शाळा मला विचारते ..._
जीवनाची परीक्षा बरोबर देतोयस ना ? 
 
मी उत्तर दिले दप्तर आता खांद्यावर नाही, एवढंच ..!
...बाकी लोकं अजून शिकवून जातात ..!!

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

२४-कॅरेट गोल्ड सीरम चेहऱ्याला देईल सोनेरी ग्लो? जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत आणि फायदे

पावसाळ्यात गुप्तांगांच्या आसपास खाज सुटल्याने त्रस्त आहात का? आराम मिळवण्यासाठी हे काही उपाय करा

रक्षाबंधनला तुमच्या बहिणींना या ७ भेटवस्तू देऊ नका, नात्यात दुरावा येऊ शकतो

नैतिक कथा : अनुकरण करावे पण शहाणपणाने

ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक महिलेने जाणून घ्याव्यात या ७ कायदेशीर गोष्टी; तुमचे अधिकार काय?

पुढील लेख
Show comments