शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शनिवार, 29 मे 2021 (16:10 IST)

लॉकडाऊन

तुला मला या साऱ्या जगाला किती तरी त्रास झालाय .
लॉकडाऊन हा शब्द नको,
तरी सध्या आपल्या आयुष्याचा भाग झालाय .
 
घरात असले सगळे, तरी ही धावपळ सुरू आहे.
हाता-पायाची नाही,सध्या मनाची कसरत सुरू आहे.
आपण सगळेच इतके घाबरलो आहोत
आपल्या जीवलगांच्या काळजीत सतत वावरत आहोत
 
दिवस रात्र सगळे,आपआपल्या देवाला आळवत आहेत.
लवकर सगळं ठीक कर अशी विनवणी करत आहेत .
 
खर तर  किती तरी जास्त
आपला देवच सोसत आहे
त्याने घडवलेले त्याचे मुलंबाळं 
आज त्याचाच राग करत आहे 
 
आता तरी काही चमत्कार घडवं रे देवा .
पुन्हा पूर्वी सारखं आयुष्य बनवं रे देवा.
 
सौ.हेमश्री विहार चाँदोरकर