रविवार, 13 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By

सासरी आई शोधायची नसते..

सासरी आई शोधायची नसते..
कारण, आई ची ऊब,
आई ची माया,
आईचा ओलावा,
आईपरि गोडवा,
फक्त आईत असतो..
 
आपली सगळी नाटकं..
आपले फालतू चे हट्ट..
आपल्या रागाचा पारा..
आपल्या मुड स्वींग चा मारा..
फक्त आई झेलणार सारा..
 
सासरी ना, ती आई शोधायची नसते..
ती आई स्वतःत उतरवायची असते.
आग्रहाचे दोन घास आपण सर्वांना भरवायचे,
सर्वांच्या सेवेस आई परि तत्पर रहायचे..
 
पन्नाशीतल्या किंवा साठीतल्या सासु ची आपणच आई व्हायचं..
त्यांना आरामात कसं ठेवता येईल यासाठी झटायचं..
त्यांनी सांभाळली ना सर्वांची वेळापत्रकं इथवर, आता, आपण सांभाळायचं..
नसते त्यांना शुद्ध स्वतःच्या खाण्यापिण्याची..
थोडं चिडायचं ही हक्काने, कारण त्याशिवाय आई पुर्ण होत नाही .. 
 
जगासमोर खुप कठोर असणार्‍या सासर्‍यांना ही असतो एक हळवा कोपरा..
आई होऊन त्यांची, बोलतं करायचं असतं त्यांना..
असते त्यांना काळजी घरातल्या प्रत्येकाची,
आपणच तर द्यायची असते ना त्यांना निवृत्ती...! 
 
आपली आई असतेच की माहेरी,
पण त्या दोघांची आई गेलेली असते देवाघरी..
त्यांना त्या मायेची अन् आधाराची गरज आपल्या पेक्षा जास्त असते..
म्हणून सासरी आई शोधायची नसते, ती आई स्वतःत उतरवायची असते..

- सोशल मीडिया