संबंधित माहिती
- Marathi Kavita : तुझं माझं सोबत असणं, अर्थ काही नाही
- पावसाळ्यात मोबाईल सेफ्टीसाठी 5 टिप्स
- Career in Bachelor of Technology (B.Tech) in Automobile Engineering :बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग करून करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम शीर्ष महाविद्यालय,पगार, व्याप्ती जाणून घ्
- फ्री फायर मोबाईल गेम खेळण्यासाठी 16 वर्षीय मुलाने आईच्या खात्यातून 36 लाख रुपये उडवले
- Flipkart Upcoming Sale 2023 : फ्लिपकार्ट पुढील विक्रीची तारीख आणि ऑफर
Marathi Kavita बसवा थोडं कोपऱ्यात मोबाईलला
दिवसभर हाताला चाळा एकच राहीला,
येऊन जाऊन मोबाईल मध्येच जीव सारा गुंतवला,
उगीचच मिनटा मिनिटा ला एकदा घेतो बघूनच,
काही आलंय का ? त्या क्षणी जाणून तो घेतोच,
गरज नसते बरं वारंवार त्यास हाताळण्याची,
पण वाईट सवय जडवली त्यात घुसून बसण्याची,
ते एक साधन आहे, आपल्या उपयोगी पडायला,
पण आपण त्याच्याच अधीन झालो, नवं नको सांगायला,
घरोघरी संवाद बंद झालाय, हे दिसून येतं,
मोबाईल नावच खेळणं जो तो घरी हातात घरून बसत!
भांडणं पण होतात त्यावरून, की बोलणं होतं नाही,
एकमेकांना काही सांगायला त्यांना उसंतही नाही.
तोडगा काढा, आपल्या आपल्या पद्धतीने,
बसवा थोडं कोपऱ्यात मोबाईलला,जगा मोकळेपणाने!
..अश्विनी थत्ते.
