1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (16:04 IST)

नॅशनल पर्यटन दिवसा निमित्ताने!

On the occasion
पर्यटन ...आले की नाही रोमांच अंगावर,
प्रत्यक्षात गेलो की स्वर्ग अगदी राहतो दोन बोटांवर,
नुसतं नावं जरी निघालं, की लगबग सुरू होते,
काय काय करायचं याची यादी तयार होते,
नवनवीन प्रदेश, सुंदर निसर्ग सगळं कसं भरभरून भेटत,
माने वरच ओझं नकळतपणे कमी होतं,
जायलाच हवं प्रत्येकांनी जमेल जसं, जमेल तेव्हा,
जीवनात मग मज्जा घ्यायची बरं केव्हा?
आपापसातील सम्बन्ध पण होतात मधुर,
त्यासाठी रोजच्या कामातून मात्र जावं लागतं दूर,
तर मग मंडळी केंव्हा निघताय तुम्ही ते सांगा!
मनापासून जा अन मनास वाटेल तसं काही काळ वागा!!
..अश्विनी थत्ते