शुक्रवार, 13 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024 (21:08 IST)

Pu La Deshpande Birthday :पु. ल. देशपांडे ह्यांची कविता मी एकदा आळीत गेलो

pula deshpande
मी एकदा आळीत गेलो
चाळ घेऊन बाहेर आलो
तोंडात भरली सगळी चाळ
मी तर मुलखाचा वाचाळ !
कधी पायात बांधतो चाळ
उगीच नाचतो सोडून ताळ
वजन भारी होते गाळणं
पायाचीही होते चाळण !
गाळणी घेऊन गाळतो घाम
चाळणी घेऊन चाळतो दाम
चाळी बाहेर दुकान माझे
विकतो तेथे हंसणे ताजे !
' खुदकन ' हसूचे पैसे आठ
' खो-खो-खो ' चे एकशे साठ
हसवणुकीचा करतो धंदा
कुणी निंदा, कुणी निंदा-कुणी वंदा !
कुणा कुणाला पडतो पेच
ह्याला का नाही लागत ठेच
हा लेकाचा शहाणा की खुळा
मग मी मारतो मलाच डोळा !!
 
पु. ल. देशपांडे