1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

ती

- मनोहर धडफळे

ती
ती रुसली होती माझ्यावर
कां? कुणास ठाऊक?
मी आर्त स्वरां
WDWD

तिला साद घालीत होतो
विरह वेदना मला जाळीत होत्या.
अखेर दमलो
डोळे मिटून, डोके दाबून बसलो मात्र
क्षण-दोनच क्षण-अन
अकस्मात ढगांचा गडगडाट
ऐकू येऊ लागला
विजा चमकू लागल्या
वादळ वारे वाहू लागले
दारं खिडक्या यांची तावदानं
आत बाहेर होऊ लागलीत
अन... अन ती आली
मला कडकडून भेटली
WDWD
अन लेखणी सरसावून
मी लिहायला सुरुवात केली
भराभर लिहू लागलो.
आता ती आली आहे ना!
तीच जिची मी
आतुरतेने वाट पहात होतो
ती आली...
ती स्फुर्ती आली.