प्राजक्ताचा सडा
स्व. सौ. मीना आठल्ये
प्राजक्ताच्या पनोपानी कितिक सजल्या बघ कलिकाकेशरी लेंग खालती आणिक वरती धवल पहा बुरखाहिरव्या काळ्या मखमालीवर फुले पसरली मुक्तपणेप्राजक्ताचा गंध उधळुनी समीर नेतो धुंदपणेआकाशाशी हितगुजणार्या कळ्या पाहती धरणीलाबहरील फुले सडा घालुनी गंधित करती मातीलाउद्या आम्हीही अशी सुगंधी वृष्टी सुंदर करणार परडीत झुलुनी हांसत जाऊनी श्रीकृष्णाला पूजणारस्वप्नामध्ये रात्र संपली अरूण हलके जागवितोआनंदाने बहरूनी देतो सर्व कळ्यांना हासवितोशत शत राशी प्राजक्ताच्या कृष्ण दावितो मांगल्यआज गंधू द्या हसू द्या उद्या व्हायचे निर्माल्यआज हासणे उद्या मलूलणे जीवन रीत जगायचीनिर्माल्याला सरित्सागरी प्राप्त होतसे संगत विष्णू चरणाचीसुगंधी सुंदर जीवन देण्या रोज बहरती लाख कळ्यानिर्माल्यास्तव बघुनी कशाला खंत करावी मना खुळ्या.