1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

- भावना दामले

आठवणीची पांखरे
आठवणीची पांखरे
NDND
तु्‍झ्या आठवणीची पांखरे
माझ्या मनाच्या घरट्यात
अजुनही येत असतात
जसा वाट चुकलेला वाटसरु
यावा आश्रयासाठी

सुख
सुख चघळायचे असते
जिभेवर ठेवलेल्या गोड वस्तु विरघळाव्या
पण, स्वाद परत परत आठवावा
तसेच सुख चघळायचे असते
मनावर सुख स्पर्शाचे ओलावे झेलत
परत परत सुखाची आठवण करत
सुख चघळायचे असते.

प्रेम
NDND
प्रेम असेच असते
सरल्यावरही उरते
उरल्यावरही बहरत राहते
आपल्या स्मृति सुगंधाने
मनाच्या कोंदणात
आठवणींच्या स्वयं प्रकाशाने
तळपत राहाते.