शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

मेघ दाटले

सौ. स्वाती दांडेकर

मेघ दाटले
ND
नीळ्या अंबरी दाटले
ढग हे किती काळे-काळे
आपल्या मधे समावुन घेतले
निर्मल शीतल जल हे सार
जन जीवना सुखी करण्या
हे किती आतुर झाले
सारे सारे मिळुनी आले
करण्या वसुंधरा हिरवी रे
संगे वार्‍याशी खेळ करती
वारा म्हणे वाहेन मी
तर ढग हे म्हणती बरसेन
मी प्रथम रे
झुंज ह्यांची पाहता पाहता
सूर्य देवता लपले मागे
पाण्याची प्रथम बूंद पडली माझ्या वरी
पडता क्षणी आठवणीची जमली
दाटी माझ्या मनी.
ND
मन हे हरवुन गेले
झाले मनोमनी मी तुझी
आठवणीची अमीट छाया
दाटली माझ्या मनी रे
आठवणीच्या छाये मधुन
जेव्हा मी बाहेर आले
तेव्हा नीळ्या अंबरानी केले
स्वागत माझे.