1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता

स्वार्थाचे निस्सीम प्रेम

पराकोटीचा कोता असतो तो जिव्हाळा

वेमुर्वत खुळं असतं ते प्रेम

ते कोणत्याही अपेक्षेवर उभं असतं

पण पाया पोखरलेला, ढोंगी, ढिसाळ

असतो त्याचा

स्वार्थाची लाळ चाटणारया, हावरट

वाळव्यांनी

आपलं काम चोख बजावलेलं असतं

मग बॉम्बस्फोटाने

कोसळणारया इमारतीपेक्षा

या कारणानी

ते टुमदार वास्तशिल्प कोसळलं

तर

मग कोणतंही हादरलेलं समर्थन

भोंगळ स्पष्टीकरण,

अगदी दधीची सुद्धा

जिवंत करणार नसतो

त्या इमारतीच्या

मलिद्यात सापडलेल्या

प्रीतीच्या मृतदेहास...


................ माधुरी अशिरगडे
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा