हे माझे जीवन
- मनोहर धडफळे
जसे फुलांनी बहरून यावेउधळित गंधा मुक्त हसावेजनमनास प्रमुदित करण्याहे माझे जीवन जावे। जळुनि स्वत: इतरां सुखवावेभस्म होऊनि स्मृति उरावेकशकाय त्या उदबत्तीसमसुगन्ध पसरित मिटून जावे।म्लान मुखाचे अश्रु पुसावेनिराश्रितांसि जवळ करावेकष्ट जनांचे हरता हरताया देहाचे खोड झिजावे।बन्ध रेशमी 'असहय' होईतोउत्कट क्षण ते सार्थ करावेआठव अपुला राहील जगा याअशा समयी हे आयुष्य सरावे।