गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By

माय मावशीचा मेळावा (वार्षिक संमेलन)

आभासी विश्वात साहित्याचे सृजन करणारे माय मावशीचे साहित्यिक मेळाव्यात आभासी मित्रांना खरोखर भेटले आणि आनंद साजरा केला. कार्यक्रम होता माय मावशीचा मेळावा. मुख्य अतिथि म्हणूनसमूहाला मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमीचे निदेशक आणि त्रैमासिक पत्रिका सर्वोत्तमचे संपादक अश्विन खरे उपस्थित होते. संबोधनात खरे म्हणाले कि राष्ट्रीय पातळी वर होणार्या साहित्य सम्मेलनाशिवाय असे हे छोटे छोटे मेळावे पर आयोजित केले गेले पाहिजे.
 
व्हाट्स ऐप वर सुरू झालेल्या माय मावशी समूहात मध्यप्रदेशातील मराठी भाषी कवि लेखक आहेत जे हिन्दी आणि मराठी दोन्ही भाषात लिहीतात. मेळाव्यात झालेल्या परिसंवादा चा विषय पण आधुनिक माध्यमांशी निगडित होता. फेसबुक आणि व्हाट्स ऐप सारख्या आधुनिक माध्यमांचा साहित्या वर प्रभाव, या विषया वर अतिथि वक्ता म्हणाले कि एकीकडे हे माध्यम साहित्या ला त्वरित गति ने जगा पर्यन्त पोचवतात आणि नवोदित लेखकां ना मोट्ठ मंच सुद्धा देतात. पण दूसरी कडे या च मुळे साहित्याच्या गुणवत्ते पर लगाम रहात नाही. इतके च नव्हे तर कॉपी पेस्ट च्या युगात अनेकदा रचना निनावी च फिरत असतात आणि त्यांची चोरी देखील होते. या परिसंवादात निशा देशपांडे. वसुधा गाडगीळ, प्रशांत कोठारी, डॉ अर्चना वैद्य करंदीकर आणि रवीन्द्र भालेरावांनी भाग घेतला, संचालन आभा निवसरकर आणि वैभव पुरोहित ने केलं.
 
वीर सावरकरांच्या पुण्यतिथि निमित्त अनादी मी अनंत मी हे अभिवाचन प्रस्तुत केले गेले. कार्यक्रमाची संकल्पना भोपाळ हून आलेल्या कवि आणि रंगकर्मी विवेक सावरीकरांची होती. डॉ यादवराव गावले आणि सुषमा अवधूत नी यात भाग घेतला.
 
रिंगण मधे सर्व सदस्यांनी आपली एक एक कविता प्रस्तुत केली. रवीन्द्र भालेराव, राहुल जगताप देव, पुरुषोत्तम सप्रे आणि प्रशांत कोठारी च्या कविते ला भरभरून दाद मिळाली.व्हाट्स ऐप वर साहित्यिक चर्चांसाठी ख्यात माय मावशी समूहात इंदौर, जबलपुर, देवास, भोपाळ, नागदा अश्या अनेक शहरातले रचनाकार सामिल आहेत. ग्रुप च्या एडमिन आणि वरिष्ठ कवयित्री अलकनंदा साने यांनी माय मावशी चा प्रवास सांगितला. कार्यक्रम चे संचालन आणि समन्वयन अर्चना शेवडे यांनी केले.
 
भोपाळ हून आलेल्या वरिष्ठ साहित्यिक अनुराधा जामदार यांनी अध्यक्षीय भाषणात भाषे ची शुद्धता जपण्या चा अनुरोध केला. चेतन फडणीस यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमात मध्यप्रदेशातील 20साहित्यिक उपस्थित होते.