शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: गुरूवार, 20 एप्रिल 2017 (12:53 IST)

प्रा. रामनाथ चव्हाण यांचे निधन

दलित साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील लेखक म्हणून ओळखले जाणारे प्रा. रामनाथ चव्हाण ( ६५)यांचे  निधन झाले. पुण्यातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, व्यक्तिचित्रे, भटक्या-विमुक्तांच्या संदर्भातील संशोधनात्मक लेखन अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये प्रा. रामनाथ चव्हाण यांनी ठसा उमटवला होता. पुणे विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे ते प्रमुख होते. बिकट परिस्थितीतून मार्ग काढत रामनाथ चव्हाण यांनी साहित्य विश्वात स्वतःची छाप पाडली होती. भटक्या-विमुक्तांचे अंतरंग, जाती-जमाती, भटक्या-विमुक्तांची जातपंचायत (खंड १ ते ४), घाणेरीची फुले , वेद्नेच्या वाटेवरून हे त्यांच्या साहित्यांना वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. याशिवाय त्यांचे आधारस्तंभ आणि पारख हे नाटकही गाजले होते.