suvichar
✕

Bleaching Private Parts प्रायव्हेट पार्टला ब्लीच करावे की नाही?

Updated: बुधवार, 6 मार्च 2024 (18:00 IST)

जर तुम्ही ते वापरत असाल किंवा वापरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हा लेख जरूर वाचा. यासंबंधी काही महत्त्वाची माहिती देण्यात येत आहे. तर ते किती सुरक्षित आहे ते जाणून घ्या.
 
वजायनल लाइटनिंग क्रीम साइड इफेक्ट्स
योनिमार्गाची त्वचा अतिशय संवेदनशील असते, परंतु तरीही लोक त्वचेचा रंग लाइट करण्यासाठी विविध उत्पाद जसे की व्हाइटिनिंग क्रीम, ब्लीचिंग इत्यादी विविध उत्पादने वापरतात. त्यामुळे अनेक दुष्परिणाम दिसून येतात.

1. त्वचेची जळजळ - ब्लीच असो किंवा व्हाइटनिंग क्रीम, या दोन्हीमध्ये विविध प्रकारची रसायने असतात. तुम्हाला माहिती आहेच की, योनीमार्गाची त्वचा खूप संवेदनशील असते आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे रसायन वापरणे खूप हानिकारक असू शकते. या स्थितीत त्वचा लाल होणे, खाज सुटणे, जळजळ होणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. योनीमध्ये सूज देखील येऊ शकते.
 
2. ऍलर्जी- बहुतेक स्त्रियांना विविध उत्पादांमधील असणार्‍या घटकांची ऍलर्जी असू शकते, परिणामी पुरळ, अंगावर उठणार्या पित्ताच्या गाठी किंवा आणखी गंभीर ऍलर्जीक प्रतिक्रिया होऊ शकतात.
 
3. संवेदनशीलता वाढते- हा भाग आधीच संवेदनशील आहे, त्यामुळे त्वचा गोरे करण्याच्या काही पद्धती, ब्लीचिंगमुळे संवेदनशीलता आणखी वाढू शकते. यामुळे लैंगिक क्रियाकलाप किंवा इतर शारीरिक संवेदना दरम्यान महिलांना अस्वस्थता येऊ शकते.
 
4. नैसर्गिक pH असंतुलित होऊ शकते- गोरं करण्यासाठी आणि ब्लीचिंग एजंट्सचा वापर नैसर्गिक pH संतुलन आणि इंटिमेट भागात चांगले जीवाणू असंतुलित करू शकतो, संभाव्यतः संसर्ग किंवा इतर असंतुलनाचा धोका वाढवू शकतो.
 
5. त्वचेवर कायमचे डाग सोडू शकतात- स्किन व्हाइटिंग प्रोडक्ट्सच्या चुकीच्या किंवा जास्त वापरामुळे त्वचेचे नुकसान होते. यामुळे त्वचेच्या रंगात कोणताही बदल होत नाही, परंतु दुष्परिणाम म्हणून त्वचेवर अधिक डाग येऊ शकतात. ज्यावर मात करणे आव्हानात्मक असू शकते.
 
अस्वीकरण- हा लेख तुमच्या माहितीसाठी आहे. तुम्हाला कोणताही वैद्यकीय सल्ला देण्याचा हेतू नाही. कोणत्याही वस्तूचा औषध म्हणून वापर करण्यापूर्वी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

मैदा न वापरता घरीच बनवा गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत 'दाल पकवान'; एकदा खाल तर पोहे-उपीट विसराल!

World Toilet Day: १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन का साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास

नेहमीचे पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा पौष्टिक व चविष्ट ब्रेकफास्ट रेसिपीज

हिवाळ्यात वजन कमी करायचे आहे? दिवसाची सुरुवात या आरोग्यदायी सवयींनी करा

पुढील लेख