रेशन
|
जमलेल्या गर्दीतून एक व्यक्ती उठून म्हणाली सुद्धा, 'आम्ही तर आठवड्यातून दोनदा उपास करायला तयार आहे.'
मंत्र्यांना बरं वाटलं. ते म्हणाले, 'ज्या देशात तुमच्या सारखे लोक असतील त्या देशातील लोकं भूकेपोटी का मरतील?'
असं म्हणून मंत्री तिथून निघाले, पण लोकांच्या चेहर्यावरील भाव बघून तिथेच थांबले. मग म्हणाले, 'काही अडचण असेल तर सांगा. लाजू नका.'
एका वृद्धानं धाडस करून विचारलं, 'साहेब! बाकी पाच दिवस आम्हाला रेशन कुठून मिळेल?'
