रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2023 (13:25 IST)

समोरून एक सुंदर मुलगी येत आहे तेव्हा तू काय करशील?

Motivational Story
एका सभेत गुरुजींनी एका ३० वर्षांच्या तरुणाला त्यांच्या प्रवचनाच्या वेळी उभे राहण्यास सांगितले.
 
"तू मुंबईत जुहू चौपाटीवर चालला आहेस आणि समोरून एक सुंदर मुलगी येत आहे, तू काय करशील?"
 
तरुण म्हणाला, "मी ती तिच्याकडे पाहेन."
 
गुरुजींनी विचारले, "ती मुलगी पुढे गेली तर मागे वळून बघशील का?"
 
मुलगा म्हणाला, "हो, बायको माझ्यासोबत नसेल तर." (सभेत सगळे हसले)
 
गुरुजींनी पुन्हा विचारले - "मला सांग, तो सुंदर चेहरा तुला किती दिवस लक्षात राहील?"
 
तरुण म्हणाला, "5-10 मिनिटे, जोपर्यंत दुसरा सुंदर चेहरा दिसत नाही."
 
गुरुजी त्या तरुणाला म्हणाले, 
 
"आता जरा कल्पना कर. तू जयपूरहून मुंबईला जात आहेस आणि मी तुला पुस्तकांचे एक पाकीट दिले आणि सांगितले की हे पाकीट मुंबईतल्या एका मोठया व्यक्तीला द्यायचे आहे...
 
पॅकेट डिलिव्हरी करण्यासाठी तुम्ही त्याच्या मुंबईतील घरी गेला तेव्हा तुम्हाला कळले की तो एक मोठा अब्जाधीश आहे.
 
घराबाहेर 10 गाड्या आणि 5 वॉचमन उभे आहेत.
 
तुम्ही आत पॅकेटची माहिती पाठवली, मग ते गृहस्थ स्वतः बाहेर आले. 
 
तुमच्याकडून पॅकेट घेतले. तूम्ही जायला निघाला तेव्हा घरी येण्याची विनंती केली. जवळ बसून गरमागरम जेवण दिले.
 
जाताना विचारले - "कसे आलात?"
 
तूम्ही म्हणालात, "लोकल ट्रेनमध्ये."
 
त्याने ड्रायव्हरला तुम्हाला इच्छित स्थळी नेण्यास सांगितले आणि तुम्ही तुमच्या जागेवर पोहोचणार इतक्यात त्या अब्जाधीश गृहस्थाचा फोन आला, 
 
"भाऊ, तुम्ही आरामात पोहोचलात ना!
आता मला सांग, किती दिवस त्या गृहस्थांची आठवण ठेवणार?"
 
तो तरुण म्हणाला, 
"गुरुजी! आपण अशा व्यक्तीला आयुष्यात मरेपर्यंत विसरू शकत नाही."
 
युवकाच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित करताना गुरुजी म्हणाले, 
 
"हे जीवनाचे वास्तव आहे.
सुंदर चेहरा थोड्या काळासाठी लक्षात राहतो, पण सुंदर वागणूक आयुष्यभर लक्षात राहते."
 
हाच जीवनाचा गुरुमंत्र आहे... चेहऱ्याच्या आणि शरीराच्या सौंदर्यापेक्षा तुमच्या वागणुकीच्या सौंदर्यावर लक्ष केंद्रित करा.. 
 
आयुष्य स्वतःसाठी आनंददायी आणि इतरांसाठी अविस्मरणीय प्रेरणादायी बनेल.
 
- सोशल मीडिया साभार