Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Dr. Sarvapalli Radhakrishnan Jayanti : कोण होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन?

Updated: शनिवार, 5 सप्टेंबर 2026 (10:07 IST)
 
राधाकृष्णन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये १९१८ - १९२१ दरम्यान काम केले. १९२१ - १९३१ या दरम्यान कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले.
 
राधाकृष्णन १९३१ - १९३६ मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. १९३९ मध्ये पंडित मदन मोहन मालविययांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतले. ते १९४८ पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले.
 
ऑक्सफर्ड विद्यापीठात दरवर्षातून काही महिने अशाप्रकारे २० वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. राधाकृष्णन यांच्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात (१९३६ - १९५२) विद्यासन निर्माण केले.
 
शिक्षणाबद्दल डॉ. राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते. म्हणूनच राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते.
 
शैक्षणिक कारकिर्दी मध्ये यश मिळवल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. ते १३ मे १९५२ - १२ मे १९६२ पर्यंत उपराष्ट्रपती राहिले. भारताने १९५४ साली त्यांना 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांना गौरविले. त्याचप्रमाणे ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती (१३ मे १९६२ - १३ मे १९६७) होते.
ALSO READ: Teachers Day 2026 Wishes in Marathi शिक्षक दिन शुभेच्छा संदेश मराठीत
सर्वपल्ली यांना नोबेल साहित्य पुरस्कारासाठी १६ वेळा तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी ११ वेळा नामांकन मिळाले होते. १७ एप्रिल १९७५ मध्ये त्यांचे चेन्नई येथे निधन झाले.
ALSO READ: Teachers Day 2026 Speech in Marathi शिक्षक दिन भाषण मराठी (सोपे आणि प्रभावी)
<>

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

एआय पासून जागतिक बाजारपेठांपर्यंत, आकाश अंबानींनी जिओचा पुढील रोडमॅप उघड केला

शेफाली वर्माने महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३,००० धावा पूर्ण करणारी सर्वात तरुण खेळाडू बनली

विवाह सोहळ्यादरम्यान आग लागल्याने किमान २२ जण जळून खाक

बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला: महानंदा एक्सप्रेसचे इंजिनसह तीन भाग रुळावरून घसरले

LIVE: मनोज जरांगे १२ सप्टेंबर रोजी मुंबईवर मोर्चा काढणार

पुढील लेख
Show comments