1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. व्हॅलेंटाईन डे

जीवलागण

सौ. माधुरी अशिरगडे

जीवलागण
NDND
मी अख्खं भूमंडळ पालथं घातलं असतं
तुझ्या डोळ्यात मला हवा तो
भाव शोधण्यसाठी
मी आकाश-पाताळ एक केलं असतं
तुला माझ्यात गुंतवण्यासाठी
पण तू कसा क्षणात उतरविलास
माझा तोरा वाटे कुणीतरी अलगद
फुलासारखा झेलावा माझा जिव्हाळा
कैक जन्म माझे तयार होते
केवळ अशा एका क्षणावर कुर्बान व्हायला
तू विचारलंस.....
तुझ्या मनात डोकावणारा 'तो' कोण

मी पुन्हा पुन्हा समजावेत माझाच दृष्टिकोन
मी खरंच नव्हते का तुझ्या खिजगणतीत
अन् मला वेडीला वाटायचं
तू स्रवतोयस आपली जीवलागण
केवळ माझ्याचसाठी
मग हा दळभद्री आत्मसन्मानाच
सोहळा तरी कशासाठी
असो, माझे खिन्न उसासे
मला खिजवत म्हणतील की
की तुझा जन्म यासाठी, याजसाठी
त्याने नवीन सावली शोधताच
उन्मळून पाडण्यसाठी.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा