शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By नई दुनिया|

घर बांधणीचा मुहूर्त

स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाला वाटते. वास्तुशास्त्रात वास्तुच्या निर्मितीसंदर्भात बरेच काही सांगितले आहे. शनिवार, स्वाती नक्षत्र, श्रावण महिना, शुभ योग, सिंह लग्न शुक्ल पक्ष व सप्तमी तिथी असा योग असल्यास त्या मुहूर्तावर वास्तुनिर्मितीला प्रारंभ करावा. हा मुहूर्त सर्वोत्तम मानला जातो. पण हे प्रत्येक वेळी शक्य असतेच असे नाही. म्हणून काही बाबी पाहिल्या पाहिजेत.

प्रत्येक महिन्याचे फळ काय?
चैत्र- तणाव, रोग, पराजय व अवनती
वैशाख- आर्थिक लाभ. शुभ.
ज्येष्ठ- अतिशय कष्ट
आषाढ- आपत्ती कोसळण्याची शक्यता
श्रावण- नातेवाईकांसाठी शुभ व वृद्धी
भाद्रपद- साधारण. काहीही विशेष लाभ नाही.
अश्विन- कौटुंबिक कलह व संबंधांमध्ये कटुता
कार्तिक- समस्या वाढतील
मार्गशीर्ष- प्रगती, संपन्नता व सुख
पौष- संपन्नता येईल, पण चोरीचे भय
माघ- विविध लाभ पण अग्नीची भीती
फाल्गुन- सर्वोत्तम, सदैव लाभ.

वास्तुनिर्मितीसाठी महिना निश्चित करताना राशिस्थ सूर्याचे स्थानही पहायला हवे.
मेष- शुभ व लाभदायक
वृषभ- अति आर्थिक लाभ
मिथून- कार्यात विघ्नाची शक्यता
कर्क- शुभ
सिंह- कार्य निर्विघ्न पूर्ण
कन्या- आरोग्याची चिंता
तूळ - आरोग्य उत्तम 
वृश्चिक - धन संग्रह 
धनू- त्रास शक्य
मकर- आर्थिक लाभ
कुंभ- मुल्यवान दागिन्यांचा संग्रह
मीन- आरोग्याची चिंता

तिथी- वास्तुनिर्मितीवेळी तिथीचेही महत्त्व आहे. कोणतेही कार्य प्रतिपदा, चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी व आमावस्येला प्रारंभ करू नये.

लग्न- वृषभ, मिथून, वृश्चिक व कुंभ राशीतील सूर्योदय फलदायी असतो.

वार- सोमवार, बुधवार, गुरूवार व शुक्रवारी वास्तुनिर्मितीला प्रारंभ केल्यास उत्तम.