suvichar

व्हेज मांचुरिअन

साहित्य : भज्यांसाठी- १ वाटी किसलेला कोबी, १ वाटी किसलेली गाजरे, १ टे स्पून आलं मिरची लसूण पेस्ट, १
टीस्पून सोया सॉस, प्रत्येकी १.५ ते २ टे स्पून मैदा व कॉर्नफ्लोअर, मीठ, अजिनोमोटो चवीनुसार, १/२ वाटी भात(शिळा असल्यास उत्तम) व तळणीसाठी तेल
 
ग्रेव्हीसाठी - ७/८ लसूण पाकळ्या, बोटभर आलं, ४/ ५ हिरव्या मिरच्या:सर्व बारीक चिरून, १टी स्पून मिरपूड ,१टेस्पून साखर, १ ते १.५ टे स्पून सोया सॉस, २ टे स्पून कॉर्न फ्लोअर, २कांदापाती बारीक चिरून, १कप पाणी, मीठ, अजिनोमोटो चवीनुसार, १ लहान कांदा, १ लहान सिमला मिरची लाल किवा हिरवी. 
 
कृती :  
सर्वप्रथम कोबी, गाजर एकत्र करणे. मैदा+कॉर्नफ्लोअर त्यात घालणे. आलं, लसूण मिरची पेस्ट घालणे, सोयासॉस घालणे, मीठ आणि अजिनोमोटो चवीनुसार घालणे. सोया सॉस मध्ये मीठ असते आणि अजिनोमोटोही खारट त्यामुळे मीठ घालताना ते लक्षात ठेवावे. सगळे एकत्र करणे, भात घालणे आणि मळणे. गोळे करणे आणि सोनेरी रंगावर तळून काढणे.  
 
कांदा आणि सिमला मिरची बारीक चौकोनी चिरणे. तेल गरम करून त्यावर कांदा, सि.मिरची परतून घेणे. आलं, लसूण, हिरव्या मिरच्या यांचे तुकडे त्यावर घालणे, परतणे. साखर, मीठ, मिरपूड, अजिनोमोटो, सोयासॉस घालून परतणे. कॉर्न फ्लोअरची अगदी थोड्या पाण्यात पेस्ट करून घेणे ती त्यात घालणे. कपभर पाणी घालून सारखे करणे. ४ ते ५ मिनिटे शिजवणे. कांदापात बारीक चिरून घालणे. सर्व्ह करायच्या आधी १०,१५ मिनिटे ग्रेव्हीत भजी घालणे. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

Shivrajyabhishek Din 2026 Wishes in Marathi शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

Fruit Pizza रंगीबेरंगी फ्रुट पिझ्झा; लहान मुलांच्या पार्टीसाठी उत्तम पर्याय

सतत पोटदुखी होत आहे? पित्ताशयातील खड्याची ही लक्षणे ओळखा, योग्य उपचार जाणून घ्या

BRO GREF Recruitment : बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (बीआरओ) ने ८९९ जीआरईएफ पदांसाठी अर्ज काढले, पात्रता जाणून घ्या

आईस फेशियल खरंच त्वचेसाठी फायदेशीर आहे का, तज्ञ काय सांगतात जाणून घ्या

पुढील लेख
Show comments