Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॉर्पोरेटजग ते घनकचरा व्यवस्थापन

Updated: मंगळवार, 7 मार्च 2017 (11:56 IST)
 
स्टोनसुप डॉट इन च्या माध्यमातून कचर्‍याची समस्या दूर करण्यासाठी त्या झटत आहेत. मालिनी या स्टोनसुप डॉट इनच्या सहसंस्तापिका आहेत. खरं तर समाजसेवेच्या क्षेत्रात त्या अपघातानेच आल्या. पण नंतर  ते त्यांचं जीवन बनून गेलं. आयुष्याचं व्रत बनून गेलं. कार्पोरेट आयुष्यातून ब्रेक घेऊन त्यांनी समाजकार्य करायचं ठरवलं आणि नंतर मागे वळून पाहिलंच नाही. वडिल सीमा सुरक्षा दलात असल्याने मालिनी यंना देशभरात फिरता आलं. वेगवेगळ्या रज्यांमध्यला शाळांमध्ये त्यांनी शिक्षण गेतलं. दिल्लीच्या डीसीई संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर 'एचसीएल' कंपनीत वर्षभर काम केलं. आयआयएम कोलकातातून पुढचं शिक्षण घेतलं. त्यानंतर 'टाईम्स बँक', पुन्हा 'एचसीएल', इन्फोसिस, 'विप्रो' या आयटी क्षेत्रातल्या बड्या कंपन्यांमद्ये त्यांनी काम केला. त्या कही वर्ष अमेरिकेतही होत्या. 
 
ज्येष्ठ नागरिकांसाठी एनजीओ सुरू करण्याच्या उद्देशाने त्यांनी 2010मध्ये नोकरी सोडली. 2012मध्ये त्या एका छोट्या कंपनीत रुजू झाल्या. अर्थात त्यावेळी त्यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम करण्याचं ठरवलं नव्हतं. 'स्पेस' या संस्थेसोबत त्या काम करत होत्या. यावेळी कचर्‍याच्या गंभीर समस्येकडे त्यांचं लक्ष गेलं. ही समस्या सोडवण्यासाठी पावलं उचलण्याची गरज असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यासोबत महिलांसाठी रोजगारनिर्मिती करण्याचा विचारही त्यांच्या मनात आला. सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी एक वर्ष ब्रेक घेतला आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. 
 
यातूनच स्टोनसुपची निर्मिती झाली. कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्राता काही तरी करण्याची इच्छा आणि स्वत:सोबत इतरांसाठी रोजगार निर्माण करण्याच्या कल्पनेतून स्टोनसुपचं रोपटं रूजलं. घनकचरा व्यवस्थापन एकट्या मालिनी यांचं काम नाही. त्यासाठी अनेक हातांची गरज असते. मालिनीचं कुटुंब या कामी मदत करतं. त्यांनी दोन मुली दत्तक घेतल्या आहेत. मालिनी यांची आईसुद्धा या कामात मदत करते. मालिनी यांच्या 70 टक्के वेळ घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात जातो. 'ग्रीन इव्हेंट्स', 'बारो अ बॅग' सारखे प्रकल्प त्यांनी राबवले. 'स्टोनसुप कंपोस्ट मेकर' आणि 'स्टोनसुप विंग्ज' हा मासिक पाळीदरम्यान वापरण्यासाठीच्या कपची निर्मिती त्यांनी केली. या कामातून 'स्वच्च भारत मोहिमे'साठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचा संदेश मालिनी देतात. प्रत्येकाने त्यांचा आदर्श ठेवायला हवा.  

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

घरी पेडिक्युअर कसे करावे: १० सोप्या टिप्स जाणून घ्या

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

अकबर-बिरबलची कहाणी : भक्तीचा विषय

पावसाळ्यात घरीच नैसर्गिक कोरफड आणि कडुलिंबाचा साबण बनवून आपल्या त्वचेचे रक्षण करा…

उत्तर भारतातील अतिशय लोकप्रिय स्ट्रीट फूड प्रकार 'छोले टिकिया'

पुढील लेख
Show comments