गेम खेळण्यास विरोध केल्याने मुलाने रेल्वे रुळावर केली आत्महत्या!
आईने मोबाइलवर गेम खेळण्यास विरोध केल्याने ओम भरत कथोरिया (15) या मुलाने रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि तितकाच हृदयद्रावक प्रकार मालाड परिसरात गुरुवारी उघडकीस आला. त्याने लिहिलेली सुसाईड नोट घरच्याना मिळाली तेव्हा त्यांनी त्याचा शोध सुरू केला आणि त्याचा छिन्नविछिन्न मृतदेह कांदिवली मालाड रेल्वे ट्रॅकवर सापडला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा ओम हा बुधवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास मोबाईलवर गेम खेळत होता. तेव्हा त्याच्या आईे हातातून मोबाईल काढून घेत दिवसभर गेम खेळणार तर अभ्यास कधी करणार? असे म्हणत गेम खेळण्यास विरोध केला. त्यामुळे ओम आईवर रागवला आणि घराबाहेर निघुन गेला. काही वेळाने त्याची आई घरी आली आणि तिला एक मिळाले जे ओम ने लिहिले होते. त्या 'मै जा रहा हू, अब कभी नही आऊंगा', असे त्यात लिहिले होते. त्याच्या आईने हे वाचताच घरच्या लोकांसह पोलीस स्टेशन गाठले. दरम्यान कांदिवली परिसरात लहान मुलाचा रेल्वे रुळावर मृतदेह सापडला अशी माहिती दिंडोशी पोलिसांना मिळाली.