1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 जून 2022 (14:12 IST)

बनावट परवान्यासह 2 मुन्नाभाई! हिंगोलीतील प्रकार उघड

fraud
हिंगोलीच्या सेनगाव शहरात बनावट प्रमाणपत्र तयार करून बोगस हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. चक्क आरोग्य अधिकार्‍यांच्या उपस्थितीत या हॉस्पिटलचा उद्धाटन सोहळा संपन्न झाला, मात्र या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे रुग्णांच्या जीवाशी खेळ करणार्‍या गोरखधंद्यावर डॉक्टरांच्या निमा संघटनेने आक्षेप घेतला आहे. 
 
रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.  हा परवाना एवढ्या अचूकतेने बनवण्यात आला होता की, आरोग्य अधिकाऱ्यांनाही त्याचा संशय आला नाही. 
 
एवढं मोठठ रुग्णालय बोगस आहे हे या मुन्नाभाईच्या एका चुकीमुळे उघड झालं. कोणतेही रुग्णालय सुरू करायचं असेल तर डॉक्टांना महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांच्याकडून अधिकृत परवाना घ्यावा लागतो. या दोन मुन्नाभाईंनी हा परवानाच बनावट तयार केला आहे. इतका हुबेहुब परवाना तयार केला की चक्क आरोग्य अधिकार्‍यांना सुद्धा यावर संशय आला नाही. परंतु या मुन्नाभाईंनी एक चूक केली ती म्हणजे परवान्याचा सिरीयल क्रमांक हा नऊ लाखापासून सुरवात केला. इथेच मुन्नाभाईचे बिंग फुटले. निमाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे.